लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँगे्रेस आणि काँग्रेसचा सहभाग असलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. गुरुवारी मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे हे शपथ घेणार आहेत. नव्या सरकारमध्ये जिल्ह्यातून तीन आमदार मंत्री होतील, असे संकेत आहेत. त्यात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, प्रहारचे बच्चू कडू आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी यंदा विजयाची ‘हॅट्ट्रिक’ केली. त्यांची काँग्रेसच्या वैदर्भीय ‘फायरब्रँड’ नेत्या अशी ओळख आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून यशोमती ठाकूर यांना कॅबिनेट महिला व बाल कल्याण हे खाते देण्याबाबत निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोपविले जाण्याची शक्यताही आहे.अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांची शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आणि निराश्रितांना न्याय, हक्कांसाठी राज्यातील कुठल्याही जिल्ह्यात लढत दिली. कडू यांनी यंदा विजयाचा चौकार मारला. यादृष्टीने ते जिल्ह्यात सर्वांत अनुभवी आमदार आहेत. बच्चू कडू हे निवडून आल्यापासून शिवसेनेसोबत आहेत. बच्चू कडू यांना शिवसेनेच्या कोट्यातून कृषी वा अपंग कल्याण मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाचा कारभार सोपविला जाण्याची शक्यता आहे.मोर्शी मतदारसंघातून लक्षवेधी विजय मिळविणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांनासुद्धा मंत्रीपद मिळणार आहे. मावळते कृषिमंत्री अनिल बोंडे यांचा पराभव केल्याने ‘जायंट किलर’ अशी त्यांची प्रतिमा झाली आहे. महाविकास आघाडीच्या घटकपक्षाला मंत्रिमंडळात सामावून घेण्याचा निर्णय झाला आहे. आघाडीचा घटकपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ- मराठवाड्यातून एकमेव देवेंद्र भुयार विजयी झाले आहेत. त्यामुळे भुयार यांचे राज्यमंत्रिपद निश्चित मानले जात आहे.
यशोमती ठाकूर, बच्चू कडू, देवेंद्र भुयार यांना मंत्रीपद?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 6:00 AM
तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी यंदा विजयाची ‘हॅट्ट्रिक’ केली. त्यांची काँग्रेसच्या वैदर्भीय ‘फायरब्रँड’ नेत्या अशी ओळख आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून यशोमती ठाकूर यांना कॅबिनेट महिला व बाल कल्याण हे खाते देण्याबाबत निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोपविले जाण्याची शक्यताही आहे.
ठळक मुद्देजिल्ह्याला तीन मंत्री : पालकमंत्रिपदी ठाकूर