शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

यशोमती ठाकूर यांचे आज संचालकपदासाठी नामांकन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2021 5:00 AM

जिल्हा बँक निवडणुकीत सर्वच राजकीय नेते मैदानात उतरले असल्याने या निवडणुकीत नेमके आहे तरी काय, असा सवाल सर्वसामान्यांपुढे उपस्थित होत आहे. ८ ते २२ सप्टेंबर दरम्यान नामांकन मागे घेण्याचा अवधी आहे. कोण मैदान साेडते, याकडे साऱ्यांच्या नजरा आता खिळल्या आहेत. जिल्ह्यातील दिग्गज नेत्या यशोमती ठाकूर या निवडणुकीच्या मैदानात उतरत असल्याने विद्यमान संचालक मंडळ कायम राहते की बँकेत ‘परिवर्तन’ होते, हे ५ ऑक्टोबरच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या  ४ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीत संचालकपदासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर या नामांकन दाखल करणार आहेत. आता दोन मंत्री, चार आमदार आणि सहकार क्षेत्रातील जिल्ह्यातील दिग्गजांच्या उमेदवारीने  जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील चुरस वाढणार आहे. बँक निवडणुकीत नामांकन दाखल करण्यासाठी ६ सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. वर्षाला २४०० कोटींची उलाढाल असलेल्या या बँकेच्या २१ संचालकांना १६८६ मतदार निवडून देणार आहेत. शुक्रवारपर्यंत यासाठी ११८ उमेदवारांनी नामांकन दाखल केले. सोमवारी ना. यशोमती ठाकूर यांच्यासह जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख हेदेखील नव्याने नामांकन अर्ज दाखल करतील, असे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, आमदार बळवंत वानखडे, आमदार राजकुमार पटेल, आमदार प्रकाश भारसाकळे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, सुरेखा ठाकरे, भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी आदींनी संचालकपदासाठी नामांकन दाखल केले. पडद्यामागून आमदार प्रताप अडसड हेदेखील या निवडणुकीत ‘गेम मास्टर’ची भूमिका बजावत आहेत. जिल्हा बँक निवडणुकीत सर्वच राजकीय नेते मैदानात उतरले असल्याने या निवडणुकीत नेमके आहे तरी काय, असा सवाल सर्वसामान्यांपुढे उपस्थित होत आहे. ८ ते २२ सप्टेंबर दरम्यान नामांकन मागे घेण्याचा अवधी आहे. कोण मैदान साेडते, याकडे साऱ्यांच्या नजरा आता खिळल्या आहेत. जिल्ह्यातील दिग्गज नेत्या यशोमती ठाकूर या निवडणुकीच्या मैदानात उतरत असल्याने विद्यमान संचालक मंडळ कायम राहते की बँकेत ‘परिवर्तन’ होते, हे ५ ऑक्टोबरच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. भाजप, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीकडून सर्वांचीच एन्ट्री झाल्याने आता या निवडणुकीत ‘आगे आगे देखो होता है क्या?’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

- तर जिल्हा बँक निवडणुकीत येणार रंगतपालकमंत्री यशोमती ठाकूर या सोमवारी संचालकपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.  सहकार क्षेत्रात ‘एन्ट्री’साठी ना. ठाकूर यांनी  गत दोन दिवसांपासून तिवसा, मोझरी येथील सहकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यांचे नामांकन कायम राहिल्यास जिल्हा बँकेच्या निवडणुकीत रंगत वाढणार आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर, बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप यांची जिल्हा बँक निवडणुकीत एकजूट आहे. सहकार पॅनेल या नावाने पुन्हा बँकेवर संचालक मंडळ आणण्याची रणनीती ही मंडळी आखत आहेत.

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर