लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आ. यशोमती ठाकूर यांचे निवासस्थानी राज्याचे ऊर्जा-नवीकरणीय ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी मतदारसंघातील विविध मागण्या व समस्या सोडविण्याचे निवेदन त्यांना देण्यात आले. समस्याचा निपटारा करण्यासंदर्भात तातडीने बैठक लावण्याचे निर्देश त्यांनी दिले.तिवसा येथील वीज वितरण कंपनीचे कार्यालय सद्यस्थितीत भाड्याच्या घरात आहे. याठिकाणी वीज देयके भरणे नागरिकांच्या घरगुती वीज व शेतीसी निगडित समस्या संदर्भात नेहमी गर्दी असते. यासाठी हे कार्यालय अपुरे पडते. त्यामुळे या ठिकाणी नवीन कार्यालय निमिर्तीसाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी त्यांनी केली. निंबोरा ते धामंत्री या दरम्यान कृषी वाहिनी सिंगल फेजचे काम पूर्ण करावे न शेंदूरजना माहुरे तेथील ३३ केव्ही वीज उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. नगरपंचायतीचे उपाध्यक्ष वैभव वानखडे, जि.प.सदस्य अभिजित बोके, तिवसा पं.स. उपसभापती लुकेश केने, विधानसभा युकाँ अध्यक्ष रितेश पांडव, युवक काँग्रेसचे पदाधिकारी वैभव काकडे, रोशन वानखडे, अंकुश बनसोड आदींनी ऊर्जामंत्र्यांकडे ही मागणी केली असता अधीक्षक अभियंता यांच्या समवेत बैठक घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. यावेळी मतदारसंघातील अनेक संस्थांचे व राजकीय पदाधिकरी उपस्थित होते.
यशोमती ठाकुरांचे ऊर्जामंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 10:48 PM
आ. यशोमती ठाकूर यांचे निवासस्थानी राज्याचे ऊर्जा-नवीकरणीय ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सदिच्छा भेट दिली.
ठळक मुद्देमागण्यांचे निवेदन : अधीक्षक अभियंत्यांसह बैठक घेण्याचे लेखी आदेश