शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

यंदा ९२९ ‘पीओएस’द्वारा खत विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 10:12 PM

जिल्ह्यात रासायनिक खतांच्या विक्रीकरिता थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रकल्प राबविण्यात येत असल्याने ९२९ पीओएस (पॉइंट आॅफ सेल) मशीन वितरित करण्यात आल्यात. शेतकऱ्यांना रासायनिक खत खरेदीसाठी आता आधार कार्डचा वापर करावा लागणार आहे.

ठळक मुद्देडीबीटी प्रकल्प : शेतकरी करतील आधार कार्डचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात रासायनिक खतांच्या विक्रीकरिता थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रकल्प राबविण्यात येत असल्याने ९२९ पीओएस (पॉइंट आॅफ सेल) मशीन वितरित करण्यात आल्यात. शेतकऱ्यांना रासायनिक खत खरेदीसाठी आता आधार कार्डचा वापर करावा लागणार आहे.आतापर्यंत खत उत्पादक कंपन्यांना निर्मितीनुसार अनुदान देण्यात येत होते. परंतु, आता जेवढ्या शेतकऱ्यांनी खताची खरेदी केली, तेवढेच अनुदान कंपन्यांना मिळणार आहे. यासाठीच्या नोंदी करण्यासाठी कृषिसेवा केंद्रांवर ९२९ पीओएस मशीन वितरित करण्यात आल्या. या मशीनचा वापर व प्रकल्पाच्या कार्यपद्धतीसाठी खतविक्रेत्यांना प्रशिक्षण देण्यात आले. जिल्ह्यात १ नोव्हेंबर २०१७ पासून या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली. यंदाच्या हंगामातही याच प्रक्रियेने खतांची विक्री करण्यात येत आहे.प्रकल्पासाठी जिल्ह्यातील अमरावती तालुक्यांमध्ये १०५, भातकुली ४०, नांदगाव खंडेश्वर ४२, चांदूर रेल्वे ३६, धामणगाव रेल्वे ६८, तिवसा ५०, मोर्शी ७८, वरूड ११७, चांदूरबाजार १०२, अचलपूर ९७, दर्यापूर ९०, अंजनगाव सुर्जी ७०, धारणी २७ व चिखलदरा तालुक्यात ७ पीओएस मशीनचे वितरण करण्यात आले.अशी आहे पीओएसची प्रक्रियाशेतकऱ्यांचा आधार कार्ड क्रमांक, त्यास आवश्यक खताचे वितरण या नोंदी खतविके्रत्याने मशीनवर नोंदवायच्या आहेत. यासाठी शेतकऱ्यांना बोटाचा ठसा द्यायचा आहे. ही मशीन सिमकार्ड, इंंटरनेटद्वारे आधारशी लिंक असल्याने शेतकºयाची आधार ओळख पटल्यावर खतविक्री करता येईल.अपवादात्मक स्थितीत पीओएस मशीन काम करीत नसल्यास मशीन सुरळीत होईपर्यंत विक्रेताने शेतकऱ्यांचे आधार क्रमांक नोंदवून घ्यायचे व मशीन सुरू झाल्यावर त्यामध्ये या क्रमांकाची नोंद घ्यायची आहे. खतविक्रीचे व्यवहार नगदी, उधारीने किंवा कॅशलेस पद्धतीने करता येणार आहे.