खरीप हंगाम : सोयाबीनचे १.२१ लाख क्विंटल बियाणे लागणारअमरावती : यंदाच्या खरीप हंगामात सात लाख २८ हजार हेक्टर पेरणीक्षेत्र प्रस्तावित आहे. याक्षेत्राला किमान एक लाख ४० हजार ९८९ क्विंटल बियाणे लागणार आहे. यापैकी ७२ हजार १४० क्विंटल सार्वजनिक, ६८ हजार ८४९ खासगी बियाणे लागणार आहे. यामध्ये महाबीजमार्फत ६७ हजार ४० क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. यामध्ये सोयाबीनसाठी १ लाख २१ हजार५०० क्विंटल, संकरीत कापूस ४ हजार ६१२ क्विंटल, सुधारित कापूस ६०० क्विंटल, तूर सहा हजार २४० क्विंटल, मूग एक हजार ३८६ क्विंटल, संकरीत ज्वार दोन हजार ८०० क्विंटल, उडीद दोन हजार ३४० क्विंटल व इतर एक हजार ५१० क्विंटल बियाणे लागणार आहे.तालुकानिहाय आकडेवारी पाहता अमरावती तालुक्यात १३ हजार ११६, भातकुली १२ हजार ९६, नांदगाव खंडेश्वर १७ हजार ३४२, चांदूररेल्वे ११ हजार ९१९, तिवसा ९ हजार ८९२, धामणगाव रेल्वे ९ हजार ७८०, मोर्शी १० हजार २१, वरूड आठ हजार ४५५, अंजनगावसुर्जी ९ हजार २८१, अचलपूर ७ हजार ८४०, दर्यापूर आठ हजार २४२, चांदूरबाजार दहा हजार २९१, धारणी सहा हजार ९२९ व चिखलदरा तालुक्यात पाच हजार ७८५ क्विंटल बियाणे लागणार आहे. (प्रतिनिधी)तालुकानिहाय असे लागणार सोयाबीन बियाणेयंदाच्या खरीप हंगामात एक लाख २१ हजार ५०० क्विंटल सोयाबीन बियाणे लागणार आहे. यामध्ये १२ हजार, भातकुली ११ हजार, नांदगाव १६ हजार, चांदूररेल्वे ११ हजार, तिवसा नऊ हजार, धामणगाव आठ हजार ५००, मोर्शी आठ हजार ५००, वरूड सात हजार, अंजनगाव सुर्जी सात हजार ५००, अचलपूर सहा हजार, दर्यापूर सहा हजार, चांदूरबाजार आठ हजार ५००, धारणी पाच हजार ५०० व चिखलदरा तालुक्यात पाच हजार क्विंटल सोयाबीन लागणार आहे.
यंदा १ लाख ४० हजार क्विंटल बियाण्यांची गरज
By admin | Published: April 18, 2017 12:23 AM