प्रात:काळी स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याचे व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन पतंजली योग समितीचे किशोर चकुले, पद्माकर पोफळी, विष्णुपंत पिंजरकर व महिला प्रतिनिधी सीमा जाधव, रेवती परसनकर,मंगला जेवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सदानंद जाधव यांनी योग दिनाचे महत्त्व विशद केले. योग प्रात्यक्षिके, विविध आसने, प्राणायाम, सूर्यनमस्कार घेण्यात आले. प्रात्यक्षिके अनूप काकडे, श्रेया ढोकणे, जान्हवी मोरे यांनी सादर केले. याप्रसंगी धावपटू मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमासाठी संदीप राऊत, राजेंद्र लवंगे, अमर जाधव, पवन जाधव, पंजाबराव दुधे, शरद घोडेस्वार, अपर्णा सव्वालाखे, शोभा भातकुलकर, लता चवाळे, मंदा शेरेकर, शोभा रावेकर, सुनीता प्रभाते, वीणा देशमुख, ईश्वर जाधव, गणेश चांदणे, रोशन सोळंके, राधा वासनिक, कोमल डवरे, वैदेही राठोड, अश्विनी कोल्हे यांनी परिश्रम घेतले.
नांदगावात एकलव्यच्या मैदानावर योग दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 4:10 AM