जागतिक योग दिनाचे औचित्य साधून शहरात पाच दिवसीय योग शिबिर आयोजित करण्यात आले होते. लहान मुलांच्या योग स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या होत्या. यात प्रथम क्रमांक विराज हरणे (शीर्षासन), मानस बोराळकर (बकासन) अनुज दळवी (गर्भासन), आनंदी झाडे वय पाच वर्ष (शीर्षासन) अधिराज सोपान जायले (गर्भासन) प्राची संजय गोमकाळे (गर्भासन) यांनी पटकाविला. या आगळ्यावेगळ्या स्पर्धेतून योगाचा प्रचार प्रसार करण्याचा नेहमी उद्देश चांदूरबाजार पतंजली योग समितीचा राहतो. त्यामुळे चांदूर बाजार तालुक्यात योगाबद्दल जागरुकता निर्माण झालेली आहे.
करो योग रहो निरोग या उक्तीप्रमाणे निरोगी राहण्याकरिता एक उत्तम साधन असलेला योग जीवनात घडावा. याकरिता सर्व साधकांनी जागतिक योग दिन म्हणून २१ जून रोजी संकल्प केले. यापुढे अखंडपणे योगाची जोडून राहू, असा निर्धार केला आहे. याप्रसंगी अंबादास पांडे, सुधीर खुळे, सुनील राऊत, महेश दळवी, पतंजली तहसील युवा प्रभारी संजय गोमकाळे, महिला पतंजली समिती तहसील प्रभारी सोनाली दळवी, संगीता गावनेर, कांचन जाधव, दीपाली बोराळकर, श्रुती राऊत, अर्चना रुईकर लहान मुलांमध्ये आनंदी झाडे, मानस बोराळकर, अनूज दळवी, प्राची गोमकाळे व इतर सर्व साधक उपस्थित होते.
याप्रसंगी शोभाताई गवळी यांनी सत्यम शिवम सुंदरम गीत गायन करून कार्यक्रमाची सांगता केली. तसेच प्रस्ताविक दीपाली बोराळकर, मार्गदर्शन सोनाली दळवी व आभार प्रदर्शन संजय गोमकाळे यांनी करून तालुक्यातील सातवा आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.