शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
2
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
3
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
4
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
5
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
6
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
7
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
8
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
9
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?
10
"घरी ऐश्वर्या आराध्याची काळजी घेते म्हणूनच मी...", अभिषेक बच्चनचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला- "पुरुषांमधला दोष हाच की..."
11
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
12
आपल्यावर गुरुकृपा आहे किंवा होणार आहे हे कसे ओळखायचे? जाणून घ्या पूर्वसंकेत!
13
८०० जणांविरोधात एआयआर, ड्रोन फुटेजमधून घेतले फोटो, संभलमधील दंगेखोरांवर मोठ्या कारवाईची तयारी
14
Utpanna Ekadashi 2024: निर्मळ मनाने विष्णुभक्ती केली असता त्याचे अनपेक्षित फळ मिळते; कसे ते पहा!
15
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
16
'जानी दुश्मन'चा खेळ खल्लास! बुमराह-विराट यांच्यात दिसला 'मिले सुर मेरा तुम्हारा सीन' (VIDEO)
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
18
उत्पत्ति एकादशी: ६ राशींना उन्नती, यश-प्रगतीची संधी; श्रीविष्णूंची कृपादृष्टी, लाभच लाभ!
19
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
20
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले

आपत्कालीन स्थितीत आहात, नो टेन्शन, जस्ट डायल ११२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 4:16 AM

पान १ अमरावती : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरित मदत देण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांकडून ‘११२’ हेल्पलाईन क्रमांक लवकरच कार्यान्वित करण्यात येणार ...

पान १

अमरावती : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरित मदत देण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांकडून ‘११२’ हेल्पलाईन क्रमांक लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. जीपीएस प्रणालीवर आधारित ही सेवा असेल. नवा क्रमांक सुरू झाल्यानंतर सध्याचा ‘१००’ हा क्रमांक बंद करण्यात येणार आहे. माहिती मिळाल्यानंतर अत्यल्प वेळात पोलिसांचे ११२ क्रमांकाचे वाहन घटनास्थळी पोहोचेल, असे नियोजन करण्यात येत आहे.

अमरावती शहर आयुक्तालयात नवा हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्याची प्रक्रिया वेेगाने सुरू आहे.

नव्या ११२ क्रमांकामुळे एखाद्या नागरिकाने मदतीसाठी दूरध्वनी केल्यानंतर त्वरित मदत उपलब्ध होईल. पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी अर्थात रिस्पॉन्स टाईम आणखी कमी होईल. यापूर्वी नागरिक तक्रार करण्यासाठी पोलिसांच्या ‘१००’ क्रमांकावर संपर्क साधायचे. आता नागरिकांना ‘११२’ हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा लागणार आहे. महिला, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाईन सेवांसाठी ‘११२’ हाच हेल्पलाईन क्रमांक असेल. आधीच्या १००, १०१ व १०९२ या तीन टोल फ्री क्रमांकांचे एकत्रीकरण करून ११२ ही प्रक्रिया केंद्रीकृत केली जाणार आहे.

अशी जोडली जाईल प्रणाली

एखाद्या नागरिकाने ‘११२’ क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर तो दूरध्वनी मुंबई आणि नागपूर येथील कॉल सेंटरमध्ये जाईल. तेथील प्रतिनिधी तक्रारदाराबरोबर संवाद साधतील. ही बहुभाषिक सेवा असल्यामुळे तक्रारदाराला भाषिक अडचण येणार नाही. अमरावती शहर आयुक्तालय नागपूर मध्यवर्ती कॉल सेंटरशी जोडले जाईल. त्यात शहर आयुक्तालयातील नियंत्रण कक्ष, दहा पोलीस ठाणी, दामिनी पथके कनेक्ट राहतील.

अशी काम करणार यंत्रणा

घटनास्थळानजीकच्या परिसरात गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या जीपीएस यंत्रणेवर, ११२ क्रमांकावर आलेल्या घटनेची, समस्येची, अडचणीची माहिती जाईल. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला कमीत कमी वेळेत मदत मिळेल. ‘११२’ हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधणारी व्यक्ती कोठून बोलत आहे, त्या स्थानाबाबतची माहिती त्वरित उपलब्ध होईल. पोलिसांना प्रत्यक्ष घटनास्थळाची माहिती काही मिनिटांत उपलब्ध होईल.

कोट १

‘११२’ हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने शहर पोलीस नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. त्यानुषंगाने शहर आयुक्तालयाला ११२ क्रमांक अंकित असलेली ११ बोलेरो वाहनेदेखील प्राप्त झाली आहेत.

- डॉ. आरती सिंह,

पोलीस आयुक्त, अमरावती