शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

युती केली तरच टिकाल नाहीतर जेलमध्ये जाल - प्रकाश आंबेडकर

By उज्वल भालेकर | Published: January 20, 2024 9:24 PM

अमरावतीत वंचीत आघाडीची जाहीर सभा...

अमरावती: कॉँग्रेससह इतर सर्वच महाविकास आघाडीतील नेत्यांच्या मानगुटीवर कारवाईची तलवार लटकून आहे. त्यामुळे जर भीत-भीत निवडणुकीला सामोरे जाल तर सर्वांच्याच मानगुटीवर तलवार कोसळेल आणि सोनिया गांधीपासून सर्वच जेलमध्ये जातील. वंचितचा एकही नेता जेलमध्ये जाणार नाही. त्यामुळे युतीमध्ये लढाल तरच टिकाल नाहीतर सर्वच जेलमध्ये जाल अशी स्पष्ट भूमिका वंचित बहुजन आघडीचे प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी जाहीर सभेमध्ये व्यक्त केली.

आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीने अमरावतीमध्ये जाहीर सभेतून एक प्रकारचे शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातील सायन्सकौर मैदानावर ही विराट जाहीर सभा पार पडली. यावेळी प्रकाश आंबेडकरांना ऐकायला लाखोंच्या संख्येने वंचितचे कार्यकर्ते व पदाधिकारी आले होते. प्रकाश आंबेडकर म्हणाले, दोन वर्षापासून महाविकास आघाडीत लोकसभेच्या ४८ जागा वाटपासंदर्भातील समजोता झालेला नाही. त्यामुळे खरच यांना बीजेपीला हरवायचे आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. ते म्हणतात वंचितला आम्ही दोन जागा देतो, त्यामुळे त्या जागा कोणत्या या संदर्भात जेव्हा कॉँग्रेसवाल्यांना विचारणा केली तर म्हणतात, अजून आमच ठरल नसल्याचे सांगतात. त्यामुळे जर बीजेपीला हरवायचा असेल तर युतीमध्ये तुम्हाला लढाव लागेल. वंचितला सोबत घेतल तर ठिक नाहीतर आम्ही सर्व ४८ जागाही लढवण्याचीही तयारी आहे. बीजेपीचा फक्त एककलमी कार्यक्रम सुरु असून त्यांना फक्त देशात एकच पक्ष ठेवायचा आहे.देशात राजकीय पक्ष टिकले पाहिजे. राजकीय पक्षच राहिले नाही तर देशातील लोकशाहीच संपुष्टात येईल. आम्ही कधीही सत्तेत नव्हतो. त्यामुळे चोरी करण्याचा प्रश्न नाही, जे सत्तेत होते त्यांनी चोरी केल्याचे मोदी सांगतात. त्यामुळे निवडणूका संपल्या सत्ता भोगणाऱ्यांना सर्वांनाच जेलमध्ये जावे लागेल. युती करायची नाही म्हणून ते बळीचा बकरा शोधत आहे. परंतु ज्या प्रकारे गरीब मराठ्यांचा उपयोग केला त्या प्रकारे वंचितचा वापर करण्याचा विचार असेल तर बीजेपी सोबत तुम्हालाही गाडल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही यावेळी प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना दिला.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAmravatiअमरावती