शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

...अन् प्रेयसीसमोरच ‘तो’ फासावर झुलला; तिच्या 'त्या' हट्टामुळे प्रेमकहाणीचा अकाली अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2022 5:56 PM

तो जीवाने गेला अन् दुसरीकडे तिच्याविरुद्ध त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला. आता तिच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

ठळक मुद्देप्रेयसीविरुद्ध गुन्हा

अमरावती : प्रेयसीने पळून जाऊन लग्न करण्याचा हेका धरल्याने, अगदी तिच्यासमोर प्रियकर फासावर झुलला. तिला काही क्षणासाठी ती गंमतच वाटली. मात्र, ती गंमत नव्हे, त्याने खरोखरच गळफास घेतला, हे लक्षात येईपर्यंत फार उशीर झाला होता. त्या हेक्यापोटी तो जीव गमावून बसला. तो जीवाने गेला अन् दुसरीकडे तिच्याविरुद्ध त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला. आता तिच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

दस्तुरनगर भागात ५ एप्रिल रोजी दुपारी १२.४५ च्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. जयेश श्यामकुमार दादलानी (२५, दस्तुरनगर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी प्रथम आकस्मिक मृत्यूची व ५ एप्रिल रोजी रात्री ११.३५ च्या सुमारास संबंधित तरुणीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. केवळ प्रेयसीच्या हेकेखोर वृत्तीमुळे त्या प्रेमकहाणीचा अकाली अंत झाला.

नांदगाव पेठ एमआयडीसीमध्ये खासगी नोकरी करणाऱ्या जयेशचे शंकरनगर परिसरातील २३ वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध होते. ते लग्नदेखील करणार होते. त्यांच्या लग्नाला जयेशच्या कुटुंबाचा विरोध नव्हता. मात्र, मुलीचे पालक टाळाटाळ करीत होते. त्यानंतरही घरच्यांच्या विरोधात जाऊन ती जयेशला पळून जाऊन लग्न करण्याचा आग्रह धरत होती. तसे न केल्यास जयेशला व त्याच्या कुटुंबाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत होती. पळून जाऊन विवाह न केल्यास आपण आपल्या जीवाचे बरे-वाईट करू, अशी धमकी ती जयेश व त्याच्या कुटुंबीयांना देत होती.

निर्णय घ्या, अन्यथा जयेशचा शेवटचा दिवस

तक्रारीनुसार, आरोपी तरुणीने जयेशच्या नातेवाईकाला ५ एप्रिल रोजी कॉल केला. आज निर्णय न झाल्यास जयेशच्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल, अशी धमकी तिने दिली. त्याबाबतही जयेशच्या वडिलांनी तक्रारीतून उहापोह केला आाहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूAmravatiअमरावती