शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

टँकरमधील डांबर उसळून भाजला युवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 10:56 PM

शहरात वाहनांच्या वर्दळीत काय घडेल, याचा नेमच राहिला नाही. टँकरमधील गरम डांबराचे शितोंडे उडल्याने एक मोपेड चालक गंभीररीत्या भाजला गेला, तर तिघांचे काळ्या डागांवरच निभावले. ही धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी ७.४० वाजताच्या सुमारास राजापेठच्या नवीन उड्डाणपुलासमोरील गुलशन मार्केटपुढील रस्त्याच्या उंचवट्यावर घडली.

ठळक मुद्देगुलशन मार्केटसमोरील घटना : तिघे किरकोळ; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल, समज देऊन सोडले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात वाहनांच्या वर्दळीत काय घडेल, याचा नेमच राहिला नाही. टँकरमधील गरम डांबराचे शितोंडे उडल्याने एक मोपेड चालक गंभीररीत्या भाजला गेला, तर तिघांचे काळ्या डागांवरच निभावले. ही धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी ७.४० वाजताच्या सुमारास राजापेठच्या नवीन उड्डाणपुलासमोरील गुलशन मार्केटपुढील रस्त्याच्या उंचवट्यावर घडली.संतोष मिठुजी सुजाने (३०, रा. गोपालनगर) असे भाजल्या गेलेल्या युवकाचे नाव आहे. नवाथेनगर स्थित एका व्यापारी संकुलात असलेल्या जाधव सोलर अँड आॅटोमोटिव्ह प्रा.लि.मध्ये व्यवस्थापक पदावर ते कार्यरत आहेत. मंगळवारी सायंकाळी ते अंबापेठ स्थित एका चार्टर्ड अकाऊंटंटकडे कामानिमित्त गेले होते. तेथून ते त्याच्या इलेक्ट्रिक मोपेडने राजापेठकडून नवाथेनगर येथे आपल्या कंपनी कार्यालयात जात होते. राजापेठ येथील उड्डाणपुलावरून गुलशन मार्केटपुढे ते आले. त्यावेळी डांबरने भरलेला एमएच १८ ए ००५३ क्रमांकाचा टँकर मागेच होता.दरम्यान, टँकर मोपेडला ओव्हरटेक करून गुलशन मार्केटच्या उंचवट्यावर आला. यावेळी अचानक टँकरने उसळी घेतल्याने त्यामधील तप्त डांबर हेलाकाले आणि त्याचे मोठ्या प्रमाणात शिंतोडे डाव्या बाजूने असलेल्या संतोष सुजाने यांच्या अंगावर उडाले. संतोष सुजाने यांनी त्यांचे वाहन थांबविले आणि चालकाला आवाज देऊन टँकर थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, टँकर चालक तेथून पुढे निघून गेला. अपघातात डांबर अंगावर पडल्याने संतोष यांचा चेहरा, हात भाजला गेला. याशिवाय त्यांच्या दुचाकीवरही डांबर उडाले. त्यांनी तत्काळ आपल्या मित्रांना घटनेची माहिती देऊन टँकरचालकाला रोखून धरण्यास सांगितले. त्यांच्या मित्रांनी नवाथेनगर चौकात टँकर थांबविला. संतोष सुजानेंवर गेट लाईफ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.मालकावर गुन्हा का नाही?डांबराची वाहतूक करताना ते सुरक्षितरीत्या नेण्याची जबाबदारी टँकर चालक व मालकाची आहे. या घटनेत याबाबत कोणतीही काळजी घेण्यात आली नव्हती. टँकरचे झाकण उघडे वा अर्धवट लावल्यानेच हा अपघात घडला, हे नक्की. यामध्ये टँकरमालकही दोषी आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, ही आश्चर्यकारक बाब आहे.तिघे बचावलेडांबरचा टँकर रोडवरील उंचवटा चढत असताना हेलकावला आणि टँकरमधील उष्ण डांबराचे शिंतोडे सर्वाधिक संतोष सुजाने यांच्या अंगावर उडाले. याशिवाय त्या मार्गाने जात असलेल्या अन्य तीन वाहनचालकांच्या कपड्यांवरसुद्धा डांबर उडाले. संतोष सुजाने गंभीररीत्या भाजले गेले, तर अन्य तीन वाहनचालक सुखरूप बचावले. त्यांच्या कपड्यावर डांबर उडाले असून, तेसुद्धा किरकोळ भाजले गेल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यांनी यासंदर्भात तक्रार केली नाही.संतोष सुजाने यांच्या तक्रारीवरून चालक संतोष विष्णू सखे (४५, रा. धामोरी, ह.मु. सातुर्णा परिसर) याच्याविरुद्ध भादंविच्या कलम २७९, ३३७ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.- किशोर सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक, राजापेठ.डांबराचे शिंतोडे चेहरा व हातावर पडल्याने तरुण भाजला गेला. त्याच्यावर उपचार सुरु केले असून, प्रकृती चांगली आहे. डांबर लागल्याने त्वचा डॅमेज झाली आहे.- नरेंद्र वानखडे,बर्न सर्जन, गेट लाइफ हॉस्पिटल.