प्रफुल्ल तायडे (२८, रा. थुगाव पिंपरी) असे आरोपीचे नाव आहे. पीडिता ही चांदूर बाजार व घाटलाडकी येथे गेली असता, आरोपीने तिचा पाठलाग केला. ३ एप्रिल ते २५ एप्रिल दरम्यान हा प्रसंग एका २३ वर्षीय तरुणीवर गुदरला. याबाबत पोलिसांत नोंदविलेल्या तक्रारीनुसार, पीडिता ही २०१५ मध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आरोपीने तिचेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. आवडतेस, लग्न कर, असा तगादा लावत वारंवार फोन कॉल केले. ती टाळत असल्याने त्याने धमकीदेखील दिली. पीडितासोबत असलेली छायाचित्र सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकीदेखील त्याने दिली. यादरम्यान १ एप्रिल रोजी पीडितचे लग्न जुळले. आरोपीला हे माहीत होताच, त्याने ते छायाचित्र पीडिताच्या वागद्त वराला पाठवून बदनामी व लग्न मोडण्याची धमकी देणारे संदेश पीडिताच्या मोबाईलवर पाठविले. या प्रकाराला कंटाळून तिने २६ एप्रिल रोजी ब्राम्हणवाडा थडी पोलीस ठाणे गाठले व प्रफुल्लविरुद्ध तक्रार नोंदविली.
तरुणीला लग्न मोडण्याची धमकी, पाठलाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 4:16 AM