तूर, हरभरा खरेदीसाठी युवक काँग्रेस आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 10:18 PM2018-05-31T22:18:31+5:302018-05-31T22:18:31+5:30
जिल्ह्यातील सर्वच बाराही केंद्रांवर खरेदी बंद असल्यामुळे ३५ हजार तीन लाख क्विंटलवर तूर शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. खरिपाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत आल्यामुळे तत्काळ तूर खरेदी करून त्वरित चुकारे देण्याची मागणी युवक काँग्र्रेसद्वारा करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील सर्वच बाराही केंद्रांवर खरेदी बंद असल्यामुळे ३५ हजार तीन लाख क्विंटलवर तूर शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. खरिपाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत आल्यामुळे तत्काळ तूर खरेदी करून त्वरित चुकारे देण्याची मागणी युवक काँग्र्रेसद्वारा करण्यात आली. याबाबत येथील इर्विन चौकात गुरुवारी आंदोलन करण्यात आले.
तुरीप्रमाणेच हरभऱ्याचीदेखील गत झाली आहे. २९ तारखेला केंद्र बंद झाल्यामुळे टोकनधारक १८ हजार शेतकऱ्यांचा हरभरा घरी पडून आहे. आतापर्यंत बारदाना व गोदाम उपलब्ध नसल्याचे कारण दर्शवून अधिक दिवस तूर हरभरा खरेदी बंद ठेवण्यात आली अनेक शेतकऱ्यांची तूर, हरभरा बाजार समितीच्या आवारात पडून आहे. शासनाने खरेदी केलेली तूर व हरभऱ्याचा चुकारा चार महिण्यापासून न झाल्यामुळे खरिपाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत आले आहे. त्यामुळे शासनाने टोकन दिलेल्या शेतकऱ्यांची तूर व हरभरा त्वरित खरेदी करावा व तातडीने चुकारे देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात अमरावती लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सागर देशमुख, विक्रम ठाकरे, परीक्षित विरेंद्र जगताप, पंकज वानखडे, रीतेश पांडव, हरीश मोरे, धनंजय बोकडे, मुकेश लालवानी, सागर यादव, रोहित देशमुख, वैभव देशमुख, आशिष जाधव, अभिनव देशमुख आदी उपस्थित होते.