फोटो - वरूड १५ एस
कोरोनामध्ये आमदार आहेत तरी कुठे? वरुडात कार्यकर्त्यांना अटक व सुटका वरूड : कोरोनाचा कहर वरूड तालुक्यात कोसळला असताना, आमदार कुठे आहेत, असा प्रश्न उपस्थित करीत गुरुवारी युवक काँग्रेसने त्यांच्या घरापुढे ताट वाजवा आंदोलन ताट केले. आंदोलनात सहभागी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली व त्यानंतर सुटका करण्यात आली. या आंदोलनामुळे तालुक्यातील राजकीय पातळीवर विविध चर्चांना उधाण आले आहे.
कोरोना महामारीत वरूड तालुक्याकडे अधिकाऱ्यांपासून तर लोकप्रतिनिधीपर्यंत सर्वांचे दुर्लक्ष आहे. कुठेही बेड उपलब्ध नसल्याने कोरोनाग्रस्तांचे हाल होत आहेत. शहरातच कोविड रुग्णालय सुरू करण्याची मागणी प्रलंबित आहे. त्याच्या निषेधार्थ नगरसेवक धनंजय बोकडे यांच्या आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी आमदारांविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. मोर्शीत कोविड रुग्णालय सुरू केले तरी तेथे सुविधा नाहीत. पीपीई किट घालून वावरण्यापुरताच तेथे वाव आहे. तेथे सुविधा देण्यात याव्या. वरूडमध्ये ५० बेडचे अद्ययावत कोविद रुग्णालय उभारण्यात यावे तसेच रुग्णवाहिका देण्यात यावी, अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली. विश्रामगृह चौकातील आंदोलनात मोर्शी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष मनोज इंगोले, जरूडचे उपसरपंच शैलेश ठाकरेसह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. वरूड पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक करून ठाण्यात नेले व तेथून त्यांची सुटका करण्यात आली. यावेळी प्रदीप चौगावकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
---------------
तालुक्यात महाविकास आघाडीमध्ये दुफळी?
महाविकास आघाडीमध्ये शिवसेना , राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार आहे. त्याला आमदार देवेंद्र भुयार यांचा पाठिंबा आहे. असे आंदोलन करण्याची काँग्रेसवर वेळ येणे हा महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील दुफळी चव्हाट्यावर येण्याचा प्रकार असल्याची चर्चा या आंदोलनामुळे तालुक्यात होती.