कोरोना नियमावलीच्या उल्लंघनाची तक्रार
अमरावती : काँग्रेसचे नवनियुक्त शहराध्यक्ष बबलू शेखावत यांच्या रॅलीमुळे कोरोनासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्याची फिर्याद शहर कोतवाली पोलिसांत उपनिरीक्षक सुदाम आसोरे यांनी केली. त्यावरून बबलू शेखावत, विलास इंगोले, हरिभाऊ मोहोड, मसीन खान, बंडू हिवसे, सादीक शाह, तन्वीर आलम, मेराज खान पठाण, सुरेश रतावा, राजू भेले व दोन महिलांविरुद्ध पोलिसांनी भादंविचे कलम १८८, १३५ मोटर वाहन कायद्यान्वये गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास गुन्हा नोंदविला.
----------------
महाजनपुऱ्यात अवैध दारू पकडली
अमरावती : खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाजनपुरा येथे अवैध दारू विक्री करणारा संतोष रामदास गडलिंग (४३) याला पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतला. त्याच्याकडून ९०० रुपयांची दारू जप्त करण्यात आली.
----------------------
एकनाथपूरम येथून संशयिताला अटक
अमरावती : एकनाथपूरम येथील एका शोरूमजवळ संशयास्पदस्थितीत आढळलेला लखन बाबूराव कदम (३६, रा. शिवाजीनगर) याला राजापेठ पोलिसांनी २३ डिसेंबरला मध्यरात्री ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम १८८, २६९, १२२ अन्वये गुन्हा नोंदविला.
------------------------
पाणी भरण्यावरून इसमाला शिवीगाळ
नांदगाव पेठ : भोईपुरा येथील सार्वजनिक नळावर पाणी भरण्यावरून पिंट्या तुकाराम मदने (२५) याने अकील खान मिया खान (५०) यांना अश्लील शिवीगाळ केल्याची तक्रार नांदगाव पेठ पोलिसांत गुरुवारी देण्यात आली. याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी भादंविचे कलम २९४, ३२३, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला.
---------------------------------