तू आम्हाला पसंत नाही, घरातून निघून जा
कुऱ्हा : ‘तू आम्हाला पसंत नाही, घरातून निघून जा, असे म्हणून शारीरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार कुऱ्हा पोलिसांना चार वर्षांपूर्वी विवाह झालेल्या ३० वर्षीय विवाहितेकडून प्राप्त झाली. त्यावरून पती किरण रामप्रसाद वानखडे, सासू आणि सासरा दौलतराव वानखडे यांच्याविरुद्ध (रा. वऱ्हा) विरुद्ध कुऱ्हा पोलिसांनी गुन्हा नोंदविला. पुढील तपास पोलीस करीत आहे.
------------------
३० वर्षीय महिलेचा विनयभंग
चांदूर रेल्वे : तू माझ्यासोबत का राहत नाही, असे म्हणून हात पकडून विनयभंग केल्याची घटना १ सप्टेंबर रोजी चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यांतर्गत एका गावात घडली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी नितीन रामभाऊ शेंडे (२८, रा. मालखेड) विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविला.
---------------------
शेतातून २५ हजारांचे केळीचे घड लंपास
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील हुसेनपूर खोडगाव शिवारातून १७५ केळीच्या झाडांवरील घड कापून लंपास केल्याची घटना १ सप्टेंबर रोजी उघड झाली. शेतकरी श्याम रामदास येवूल यांच्या तक्रारीवरून अंजनगाव पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.
------------------
दुचाकी रस्त्यात उभी केल्यावरून काठीने मारहाण
खल्लार : स्थानिक पोलीस ठाण्यांतर्गत कसबेगव्हाण येथे घराचे काम करताना दुचाकी रस्त्यात उभी केल्यावरून युवकाला काठीने मारहाण करण्यात आली. मोहम्मद आसिफ शेख रशीद यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मो. मजिद अ. हफीज, अ. हफीज शे. गणी, अ. मतीन शे. जमील विरुद्ध गुन्हा नोंदविला.
----------------