------------------------------------------------------------------------------------
सुपर हायवेवरून दुचाकी लंपास
अमरावती : सुपर हायवेजवळील बंद टोलनाक्याजवळून तीन हजार रुपये किमतीची दुचाकी क्रमांक एमएच २५ डी १८३३ ही अज्ञात आरोपीने लंपास केल्याची घटना ९ डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविला आहे. फिर्यादी शेख नईम शेख बजीर (४८, रा. बिच्छु टेकडी) यांनी पोलिसात तक्रार नोंदविली.
------------------------------------------------------------------------
कार अपघातात दुचाकीस्वार जखमी
अमरावती : कारने पाठीमागून येऊन दुचाकीस्वाराला धडक दिल्याने युवक जखमी झाल्याची घटना वलगाव येथील बसस्थानकासमोर शुक्रवारी घडली. फिर्यादी मंगेश श्ंकराव सोनोने (३२, रा. किशोरनगर) यांच्या तक्रारीवरून वलगाव पोलिसांनी एमएच ३७- ए ३०२९ च्या कारचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला.
फिर्यादी हे दुचाकीने जात असताना कारचालकाने धडक दिली. त्याच कारने रिचा मंगल कार्यालयासमोर अशोक पंजाबराव सोळंके (३०, रा. वलगाव) याला मागून धडक दिली, तोसुद्धा जखमी झाला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
---------------------------------------------------------------------
अवैध रेतीचा ट्रक पकडला
अमरावती : विना रॉयल्ट्री अवैध वाळूची वाहतूक करताना आढळल्याने खोलापुरीगेट पोलिसांनी रेतीसह ट्रक जप्त केला. ही कारवाई चांदोरी मार्गावर १९ सप्टेंबर रोजी करण्यात आली. याप्रकरणी शुक्रवारी गुन्हा नोंदविण्यात आला. अझीजुद्दीन फरीद्दीन (३३,) न्य ॲप्रोज रोड ताडदेव मुंबई, तसेच एमएच ३० एव्ही ०८४३ च्या मालकावर गुन्हा नोंदविला. यासंदर्भात पीएसआय अ्श्विनीकुमार महाजन यांनी तक्रार नोंदविली होती. ट्रकमधून १८ हजार ७२० रुपये किमतीची ४.६८ ब्रास रेती जप्त करण्यात आली.
---------------------------------------------------------------------------