पोलीस सरसावले : हिंदू संघटनांचा विरोध, निर्जन स्थळांवर नजरसंदीप मानकर अमरावतीअव्यक्त प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे ‘व्हॅलेन्टाईन डे’. रोज डेपासून सुरू झालेला व्हॅलेन्टाईन विकचा समारोप मंगळवारी व्हॅलेंटाईन डे ने होणार असून हा प्रेमदिन साजरा करण्यासाठी तरुणाई सरसावली आहे. परस्परांबद्दल प्रेम भावना व्यक्त करताना आवडत्या व्यक्तीला भेटवस्तू देण्यात येते. मंगळवारी प्रेमदिनाचा उत्साह ओसंडून वाहणार आहे. त्यासाठी फुले आणि भेटवस्तूंची बाजारपेठ सजली आहे. ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या पूर्वसंध्येला विविध भेटवस्तूंची खरेदी करण्यासाठी तरुणार्इंने बाजारपेठेत धाव घेतली. दरम्यान काही संघटनांनी ‘व्हॅलेन्टाईन डे’ला विरोध दर्शविला असून सार्वजनिक ठिकाणी तरुणाईचा प्रेमालाप खपवून घेतल्या जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमिवर पोलिसांचे कानही टवकारले आहेत. कोट्यवधींची उलाढालअमरावती : ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या दिवशी तरुणाईच्या उत्साहाला वेगळे परिमाण लाभत असल्याने त्यांच्या उत्साहाला आवर घालण्यासाठी शहर पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. सार्वजनिक उद्याने, फूड झोन, आणि चित्रपटगृहांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहेत. ७ फेब्रुवारीला 'रोज डे'ने ‘व्हॅलेन्टाईन डे’ला सुरुवात झाली. रोड डेच्या पाठोपाठ प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमीस डे, हग डे, किस डे साजरा करण्यात आला. त्यानंतर १४ फेब्रुवारीला साजरा होणारा ‘व्हॅलेन्टाईन डे’ अवतरला आहे. व्हॅलेन्टाईन डे साजरा करण्यासाठी विविध कॉफी शॉप व आईस्क्रीम सेंटरमध्ये बसण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणाऱ्यांवर पोलिसांची नजर राहणार आहे. ‘व्हॅलेन्टाईन डे’ साजरा करण्यासाठी एकीकडे तरुणाई सज्ज झाली असताना व्यापाऱ्यांनीही हा डे कॅश करण्यासाठी दुकाने सज्ज ठेवली आहेत. भेट वस्तुंमध्ये अनेक वस्तुंचा समावेश आहे. यात टेडीबिअर ४९ रुपये ते ३ हजार रुपयांपर्यंत विक्रीस उपलब्ध आहे. पिलो, कपल स्टेच्यू, चायना चॉकलेट, बॅग चॉकलेट, विविध प्रकारचे ब्रेसलेट, कपल कि चन रिंग व विविध प्रकारच्या भेट वस्तू बाजारपेठेत उपलब्ध आहेत. आठवडाभऱ्यात बाजारपेठेत या निमित्ताने कोट्यवधीची उलाढाल झाली आहे. (प्रतिनिधी)उद्यान, कॉफी शॉपकडे तरुणाईची धाव ‘व्हॅलेन्टाईन डे’ साजरा करण्यासाठी प्रेमीयुगुलांनी ‘प्लॅन’ आखले असून अनेक जण वडाळी तलाव गार्डन, छत्री तलावाकडे मोर्चा वळविणार आहेत. याखेरीज उच्चभ्रूंसाठी ओळखल्या जाणाऱ्या कॉफी शॉपधारकांनी ‘व्हॅलेन्टाईन डे’साठी खास सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यासोबतच परस्परांसोबत काहीवेळ निवांत घालवता यावा, यासाठी अनेकजण चित्रपटगृहांची पायरी चढणार आहे. तर काही जणांनी लाँग ड्राईव्हला पसंती दिली आहे. ‘लाँग ड्राईव्ह’ला पसंतीआपल्या आवडत्या व्यक्तीसोबत ‘व्हॅलेनटाईन डे’ साजरा करण्यासाठी अव्यक्त भावना व्यक्त करण्यासाठी, परस्परांना प्रपोज करण्यासाठी ‘लाँग ड्राईव्ह’चा पर्याय निवडल्या जातो. यासाठी चांदूररेल्वे रस्त्यावरील मालखेड पर्यटन स्थळाला पसंती दिली जाते. तपोवननजीकचा वॉटर पार्क, चिखलदरा, मुक्तगिरी ही पर्यटनस्थळे सुद्धा प्रेमीयुगुलांची आश्रयस्थाने आहेत.
‘व्हॅलेन्टाईन डे’ साजरा करण्यासाठी तरुणाई सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2017 12:06 AM