शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

गुटखा विक्रीविरोधात युवासेनेचा एल्गार

By admin | Published: June 13, 2017 12:07 AM

शहरासह जिल्हाभरात मागील अनेक महिन्यांपासून अवैधरित्या गुटखा विक्रीचा व साठेबाजाचा व्यवसाय चांगलाच वाढला आहे.

अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : तातडीने कारवाईची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरासह जिल्हाभरात मागील अनेक महिन्यांपासून अवैधरित्या गुटखा विक्रीचा व साठेबाजाचा व्यवसाय चांगलाच वाढला आहे. राज्यात गुटखा बंदी असतानाही सरेआम अवैध धंदे सुरू आहेत. जिल्हाभरात त्वरित अवैध गुटखा विक्रीला आळा घालण्यात यावा, अशी मागणी सोमवारी अपर जिल्हाधिकारी के.आर. परदेशी यांच्याकडे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख पराग गुडधे यांच्या नेतृत्वात निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. यावर तीन दिवसांत कारवाई न झाल्यास युवासेना जिल्हाकचेरी समोर गुटखा विक्रीचा व्यवसाय सुरू करेल, असा इशारासुद्धा यावेळी आंदोलकांनी दिला आहे.राज्य शासनाने संपूर्ण राज्यभरात गुटखा बंदी लागू केली आहे. मात्र या बंदी आदेशाची पायमल्ली करीत शहरासह जिल्हाभरात अवैध गुटखा विक्रीचा व्यवसाय चांगलाच फोफावला आहे. विशेष म्हणजे गुटख्याची जिल्ह्यातच निर्मिती होत असून यात अत्यंत घातक असे मादक पदार्थ मिसळवून विक्री सुरू आहे. मात्र याकडे प्रशासकीय यंत्रणेकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे अवैधरीत्या होणारी गुटखा विक्री व निर्मिती करणाऱ्यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी युवासेनेनच्या वतीने अपर जिल्हाधिकारी व विविध ठिकाणच्या तहसीलदारांनाकडे निवेदनाव्दारे केली आहे. यावर तीन दिवसांत कारवाई करावी, अन्यथा युवासेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात गुटखा विक्रीचे दुकान सुरू करण्याचा इशारा जिल्हाप्रमुख पराग गुडधे, वैभव मोहोकार, विक्रम लाड, गजेंद्र पाटेकर, मोहन येखंडे, रितेश काळे, नितीन भोरे, पराग नरसेकर, पंकज कदम, अभिजित भावे, अमोल गावंडे, मुन्ना शर्मा, शैलेश पांडे, संदीप मेहळे आदींनी दिला आहे.