संजय खासबागे।लोकमत न्यूज नेटवर्कवरुड : शारीरिक व्यंगावर मात करीत आपल्या कलेची रसिकांना मोहिनी घालणारा तालुक्यातील ढगा येथील चित्रकार युवराज ठाकरे याला राष्ट्रीय कलारत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. हा सोहळा ११ नोव्हेंबर रोजी राजस्थानात होत आहे.युवराजने भावनाप्रधान व वस्तुदर्शक चित्रांतून सामाजिक परिस्थितीचे यथार्थ दर्शन घडविले आहे. स्त्री अत्याचार, बेटी बचाव यांसारख्या विषयांवर त्याने रेखाटलेल्या चित्रांची विविध ठिकाणी प्रशंसा झाली आहे. त्याने तासन्तास खुर्चीत बसून स्केच रंगविले. हुबेहूब चित्र साकारण्यात त्याचा हातखंडा आहे. अनेक चित्रप्रदर्शनात सहभाग नोंदवित असतानाच नवी दिल्ली येथे अमनदीपसिंग बसीर यांच्या आर्ट गॅलरीत युवराजच्या चित्रांना स्थान मिळाले. येथून युवराजच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली.दिल्ली, पंजाब, चंदीगढ, पश्चिम बंगाल, राजस्थानसह विविध राज्यांतील आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आलेल्या राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय स्तरावरील कला प्रदर्शनांमध्ये युवराजच्या चित्रांना स्थान मिळाले आहे.दोन आंतराष्ट्रीय, पाच राष्ट्रीय पुरस्कार तसेच तीन सुवर्ण, दोन रजत व दोन कांस्यपदकांचा मानकरी ठरलेल्या युवराजला राजस्थानातील राष्ट्रीय कलापर्व के्रयान्स टेक या संस्थेने यंदाचा ‘राष्ट्रीय कलारत्न पुरस्कार’ जाहीर केला आहे.\बारावीपर्यंतचे शिक्षण गावातचयुवराज आनंद ठाकरे दोन्ही पायाने अपंग आहे. शिक्षणाची व चित्रकलेची आवड पाहून वडिलांनी त्याचे शिक्षण सुरू ठेवले. गावातील शाळेत बारावी केल्यानंतर अमरावती येथून एटीडी व डीडीआर अभ्यासक्रम त्याने पूर्ण केला. सध्या तो ढगा येथील स्व.सरस्वताबाई ठाकरे विद्यालयातील विद्यार्थ्याना चित्रकलेचे धडे देतो.
वरूडच्या युवराजला ‘राष्ट्रीय कलारत्न’ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 10:24 PM
शारीरिक व्यंगावर मात करीत आपल्या कलेची रसिकांना मोहिनी घालणारा तालुक्यातील ढगा येथील चित्रकार युवराज ठाकरे याला राष्ट्रीय कलारत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
ठळक मुद्देअपंगत्वावर केली मात : अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी