शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
2
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
3
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
4
लोकसभेचं गणित विधानसभेला जुळत नसल्याने महाविकास आघाडीला ४० जागांवर बसणार फटका?
5
गौतम गंभीर नाही! वरिष्ठ खेळाडूच भारताच्या पराभवाला जबाबदार; माजी खेळाडूंचे रोखठोक मत
6
J&K: अखनूरमध्ये सैन्याच्या ताफ्यावर हल्ला; चकमकीत 3 दहशतवादी ठार
7
“आमच्या नादी लागू नका, मर्द होता मग पळून कशाला गेला?”; थोरातांचा सुजय विखेंना सवाल
8
बॉलिवूड निर्मात्याच्या लेकाचा बॅक टू बॅक हिट शो! Ranji Trophyत झळकावलं सलग दुसरं द्विशतक
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात राजकीय घडामोडींना वेग! उत्तर विधानसभेतील उमेदवारीवरुन माजी नगरसेवकांची नाराजी, वाड्यावर बैठक सुरु
10
"कधी न चालणारा माणूस..."; अमित ठाकरेंच्या दाव्यावर सदा सरवणकरांचा खोचक टोला
11
पुण्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व पणाला; दोन्ही पवारांचे पक्ष किती जागांवर लढवतायत निवडणूक?
12
अभिनेत्रीचा पती होण्यापेक्षा नवाब मलिकांची मुलगी होणे केव्हाही चांगले; सना मलिकांनी स्वरा भास्करला सुनावले
13
वडील मजूर, बहिणीच्या लग्नानंतर कर्जाचा डोंगर; शाळेबाहेर भुईमुगाच्या शेंगा विकते विद्यार्थिनी
14
अखेर भाजपला उमेदवार मिळाला, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'हा' नेता मैदानात...
15
महिलांसाठी विशेष स्कीम, गुंतवणूकीवर मिळतोय जबरदस्त रिटर्न; पाहा संपूर्ण डिटेल 
16
माझी बायको हिरोईन नाही म्हणून तिकिट मिळालं नसावं; शरद पवार गटातील इच्छुकाची खंत
17
"... अन्यथा बाहेर पडणं कठीण होईल," का धोनीनं तरुणांना दिला F&O पासून दूर राहण्याचा सल्ला?
18
सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम, म्हणाले, "मी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आणि विजयी होणार’’
19
क्रिकेटमध्ये नाही काडीचा रस; तरी या मुद्यावरून साक्षीनं घातली MS धोनीशी हुज्जत
20
'हे' आहेत देशातील सर्वात महागडे १० शेअर्स; किंमत आणि रिटर्न ऐकून अवाक् व्हाल; तुमच्याकडे आहे?

जिल्हा परिषदेचे बजेट एक कोटींचे होणार ?

By admin | Published: February 22, 2016 12:41 AM

जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पासाठी वित्त विभागाने बांधकाम, सिंचन, समाजकल्याण, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण, ...

संकेत : अर्थसंकल्पासाठी १८ मार्चला विशेष सभाअमरावती : जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पासाठी वित्त विभागाने बांधकाम, सिंचन, समाजकल्याण, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण, पाणीपुरवठा विभाग, शिक्षण, अन्य विभागाचे खातेप्रमुखांकडून योजनानिहाय निधीची आवश्यकता मागील वर्षीच्या बजेटमधील तरतूद, अशी महत्त्वाची माहिती वित्त विभागाने मागविली आहे. या माहितीच्या आधारावर जिल्हा परिषदेत बजेटची तयारी सुरू आहे. मागील वर्षी सुमारे १९ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प जिल्हा परिषदेने मंजूर केला होता. यंदा यामध्ये सुमारे १ कोटी रूपयांची भर पडणार आहे. जिल्हा परिषद सध्या आगामी मार्च महिन्यात मांडलेल्या बजेटची जवळपास अंतिम टप्प्यात आहेत. यंदाचा अर्थसंकल्प मागील वर्षीच्या तुलनेत साधारणपणे १ कोटीने वाढीव राहणार असल्याचे संकेत आहे. जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नात फारसी वाढ झाली नसल्याने यंदाच्या बजेटमध्ये आर्थिक तरतूद फारसी होणार नसल्याचे यावरून दिसून येते. जिल्हा परिषदेचा दरवर्षी मार्च महिन्यात सन २०१६-१७ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प मार्चअखेरीस सादर केला जातो. यासाठी वित्त विभागाकडून फेब्रुवारी महिन्यात या कामाची लगबग सुरू होते. त्यानुसार मुख्यलेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे यांच्या मागदर्शनाखाली वित्त विभागाचे अधिकारी करीत आहे. जिल्हा परीषदेच्या सेस निधीमधून, अर्थसंकल्पीय तरतूद करावी लागते.उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादित असल्याने जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प हा साधारण पणे २० ते २२ कोटीचा राहतो.जिल्हा परिषदेत उत्पन्न वाढीचे पाहिजे तसे साधन नाहीत. त्यामुळे विकास कामासाठी नियोजन करून निधीची तरतूद करतानाही अनेक ठिकाणी काटकसर करावी लागते. यंदाचे अर्थसंकल्पात जिल्ह्यात दुष्काळी परीस्थिती असल्यामुळे अर्थसंकल्पात कृषी विभागासाठी बरीच तरतूद होणार असल्याचे संकेत आहेत. याशिवाय समाजकल्याण, आरोग्य, शिक्षण, बांधकाम, सिंचन, पाणीपुरवठा, आदी विभागा भरीव निधी मिळणार असल्याचे संकेत आहेत. ही वित्त विभागाची प्राथमिक स्तरावरील तयारी आहे. मात्र बजेटची तयारी पूर्ण झाल्यानंतर सीईओ व सभापती निर्णय घेणार आहेत.