अमरावती : जिल्हा परिषद शाळांवरीलशिक्षकांची बिंदू नामावली निश्चित झाल्यानंतर बदली, समायोजन प्रक्रिया जवळपास आटोपली आहे. यानंतर जिल्ह्यातील मेळघाट या (पेसा) क्षेत्रात ३१३ शिक्षकांची पदे रिक्त आहेत.तर गैरआदिवासी भागात उर्दु माध्यमाची ५८ शिक्षकांच्या रिक्त जागा आहेत. या जागा भरण्यासाठी शासनस्तरावरून आता हालचाली सुरू झाल्या आहेत.
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून यापैकी उर्दु माध्यमाच्या ५८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीचे माहिती शिक्षण विभागाने नुकतीच शासनाकडे सादर केली आहे. लवकरच प्रक्रिया सुरू होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे सध्या पेसा क्षेत्रातील पदे सध्या भरली जाणार नसली तरी ही पदेही आगामी काळात होणाऱ्या पेसा क्षेत्रात होणाऱ्या पदभरती दरम्यान भरली जाणार आहेत.
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या बिंदू नामावलीचं भिजत घोंगडं मागील अनेक वर्षांपासून कायम होते. त्यामुळे गरज असतानाही शिक्षकांच्या बदल्या करता येत नव्हत्या. याशिवाय आंतरजिल्हा बदलीनेही शिक्षकांना रिक्त जागेवर सामावून घेतांना अडचणी होत्या. नव्याने भरतीही करता येत नव्हती. त्यामुळे शिक्षण विभागाने हा प्रश्न प्राधान्याने हाती घेतला होता.
सीईओ अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी बुध्दभुषण सोनवने व त्याच्या चमूने बिंदू नामावलीचे काम पूर्ण करून घेतले.बिंदूनामावली निश्चित झाल्यानंतर रिक्त जागांची स्थिती समोर आली. यात जिल्हा परिषदेतील उर्दु माध्यमाच्या ५८ जागा रिक्त असलेल्या या जागा आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत. याअनुषंगाने शिक्षण विभागाने शासनाकडे माहिती सादर केली आहे.'उर्दू' माध्यमाला मिळणार शिक्षकजिल्हा परिषदेच्या माध्यमातून उर्दू शाळाही चालविल्या जातात. या शाळांवरील शिक्षकांच्या ५८ जागा रिक्त आहेत. शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या जागाही आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.बिंदू नामावली निश्चित केल्यानंतर जिल्हा परिषद शिक्षकांच्या पेक्षा क्षेत्रातील मराठी माध्यमाची ३१३ पदे रिक्त आहेत.ही पदे ज्यावेळी पेसा क्षेत्रातील स्वतंत्र पद भरती होईल त्यावेळी भरली जातील. आता मात्र उर्दु माध्यमाची जवळपास ५८ जागा रिक्त आहेत.या जागेवर आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे.रिक्त जागाबाबतची माहिती शासनाला सादर केलेली आहेत. लवकरच ही प्रक्रिया सुरू होईल.- अविश्यांत पंडा मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. अमरावती