लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या पळसखेड गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री डॉक्टर नसल्याने गावातील नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला रविवारी रात्री ११.३० वाजता कुलूप ठोकले. जि.प. अध्यक्षांच्याच गावाच्या पीएचसीची ही अवस्था असेल तर जिल्ह्यातील इतर गावांच काय, असा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. रविवारी रात्री १० च्या सुमारास तालुक्यातील पळसखेड गावातील एका युवकाने शासकीय विहिरीत उडी घेतली. त्यानंतर ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून त्या युवकाला बाहेर काढले. त्यानंतर प्रथमोपचारासाठी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घेतली. तेव्हा आरोग्य केंद्रात कुणीच हजर नव्हते. काही वेळानंतर एक आरोग्य परिचारिका आल्या व त्यांना जस जमेल तशा पद्धतीने उपचार केला. मात्र त्या ठिकाणी निवासी डॉक्टर नसल्याने योग्य उपचार होऊ शकला नाही. रुग्णाची परिस्थिती पाहता त्याला १०८ क्रमांकाची रूग्णवाहीका बोलावून चांदुर रेल्वे येथे पाठविण्यात आले. मात्र नंतर डॉक्टर नसल्याने गावातील लोकांत असंतोष निर्माण झाला होता. त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कॉल केले, पण त्यांचा एकही कॉल उचलला नसल्याने गावक?्यांनी सांगितले. त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी माजी सरपंच संजय पुनसे यांच्या नेतृत्वात प्राथमिक आरोग्य केंद्राला रात्री ११.३० वाजता कुलुप ठोकले.
जि.प. अध्यक्षांच्या गावातील पीएचसीमध्ये डॉक्टर नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 11:35 PM
जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या पळसखेड गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री डॉक्टर नसल्याने गावातील नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला रविवारी रात्री ११.३० वाजता कुलूप ठोकले. जि.प. अध्यक्षांच्याच गावाच्या पीएचसीची ही अवस्था असेल तर जिल्ह्यातील इतर गावांच काय, असा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
ठळक मुद्देरुग्णांचे हाल : संतप्त गावकऱ्यांनी पीएचसीला ठोकले कुलूप