लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेतील निवडक पदाधिकारी व अधिकाºयांचा १ ते ४ आॅगस्टपर्यंत राज्य ग्रामीण विकास संस्थेमार्फत (यशदा)च्या वतीने औरंगाबाद विभागातील नाविण्यपूर्ण उपक्रम व योजना राबविण्यात अग्रेसर असलेल्या गावांची पाहणी करणार आहेत. या दौºयात जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सरपंच आदी संस्थाचे निवडक पदाधिकारी व शासकीय विभागाचेकाही अधिकारी असे एकूण ४० जणांची चमू या राज्यांतर्गत शासकीय दौºयावर मंगळवारी रवाना झाले आहेत.ग्रामविकासाचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविलेल्या ग्रामपंचायतील विविध पुरस्कार प्राप्त आदर्श ग्रामपंचायती त्यांनी नाविन्यपूर्णरीत्या राबविलेले उपक्रम, योजना, कामे, संकल्पना आपल्या जिल्ह्यात राबविण्यासाठी ते प्रेरित व्हावे, यासाठी हा शासकीय दौरा आहे. विविध ठिकाणी भेटी देऊन तेथील नाविण्यपूर्ण उपक्रमाची माहिती घेणार आहेत. मंगळवार १ आॅगस्ट रोजी अभ्यास दौºयावरील वाहनाला जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, मुख्यकार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रकाश तट्टे, जे.एन आभाळे, कार्यकारी अभियंता राजेंद्र डोंगरे, पतंगराव आदी हिरवी झेंडी दाखवून ही बस रवाना केली.
झेडपी पदाधिकारी, अधिकारी दौºयावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 11:38 PM