लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ग्रामविकास मंत्रालयात १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीमध्ये अमरावती जिल्हा परिषदेचे ३१ वे अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गाला गेले आहे. काँग्रेस पक्षात या प्रवर्गाच्या दावेदारांची संख्या मोठी असल्याने पक्षनेत्यांची कसोटी लागणार आहे.जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या मागील काही वर्षांतील आरक्षण प्रवर्गाची माहिती ग्रामविकास विभागाद्वारे यापूर्वीच मागविण्यात आली होती. आतापर्यंत झालेले आरक्षण पाहता, यावेळी सर्वसाधारण महिला किंवा नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षण राहील, असे अंदाज वर्तविले जात होते. मंत्रालयात ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सकाळी ११.३० वाजता काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीमध्ये जिल्हा परिषदेच्या ३१ व्या अध्यक्षपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) असे आरक्षण निघाले आहे.विद्यमान अध्यक्ष नितीन गोंडाणे यांचा कार्यकाळ २० सप्टेंबरला संपुष्टात आला आहे. मात्र, राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी लागलेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर त्यांना चार महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. आता अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले असल्याने येत्या काही महिन्यांत नव्याने अध्यक्षपदाची निवडीची प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ५९ पैकी दोन रिक्त जागांचा अपवाद वगळला, तर ५७ सदस्यांमध्ये मिनी मंत्रालयात नागरिकांचा मागास प्रवर्गात १६ सदस्य आहेत. यामध्ये आठ पुरुष आणि आठ महिलांचा समावेश आहे.नामाप्र संवर्गात हे आहेत सदस्यअनिरुद्ध ऊर्फ बबलू देशमुख, राजेंद्र बहुरूपी, अभिजित बोके, प्रकाश साबळे, विजय काळमेघ, सुनील डिके, जयंत देशमुख, सुरेश निमकर, पूजा येवले, प्रियंका दगडकर, गौरी देशमुख, पूजा आमले, अलका देशमुख, पार्वती काठोळे, वंदना करूले, मयूरी कावरे या सदस्यांचा समावेश आहे.सर्वसाधारण प्रवर्गातील सदस्यसुनंदा काकड, वासंती मंगरोळे, योगिता जयस्वाल, माया मालवीय, वनिता पाल, सीमा घाडगे, सरला मावस्कर, पूजा होडोळे, राधिका घुईखेडकर, सुहासिनी ढेपे, दत्ता ढोमणे, रवींद्र मुंदे, दयाराम काळे, बाळासाहेब हिंगणीकर, सारंग खोडस्कर, संजय घुलक्षे, प्रवीण तायडे, महेंद्रसिंह गैलवार यांचा सर्वसाधारण प्रवर्गातील सदस्यांमध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे, सर्वसाधारण प्रवर्गातील सदस्याकडे नागरिकांचा मागास प्रवर्गाचे जातवैधता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
झेडपी अध्यक्षपदाचे ‘नामाप्र’ आरक्षण जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 6:00 AM
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या मागील काही वर्षांतील आरक्षण प्रवर्गाची माहिती ग्रामविकास विभागाद्वारे यापूर्वीच मागविण्यात आली होती. आतापर्यंत झालेले आरक्षण पाहता, यावेळी सर्वसाधारण महिला किंवा नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षण राहील, असे अंदाज वर्तविले जात होते.
ठळक मुद्देसंवर्गातील १६ दावेदार : काँग्रेस पक्षनेत्यांची लागणार कसोटी