Makar Rashi Bhavishya 2023: मकर रास वार्षिक राशीभविष्य: कार्यक्षेत्रात प्रगती, मान-सन्मान वृद्धी; कष्ट करायची ठेवा तयारी!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 02:31 PM2022-12-29T14:31:05+5:302022-12-29T14:32:50+5:30
Makar Rashifal 2023: मकर राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होत आहे. सन २०२३ मकर राशीच्या व्यक्तींसाठी कसे असेल? जाणून घ्या...
मकर राशीच्या व्यक्तींच्या बाबतीत एक समज आहे की, आपण फक्त स्वतःच्या बाबतीतच विचार करता व काहीसे स्वार्थी असता. काही अंशी हे खरे सुद्धा आहे, परंतु जेव्हा आपण समाजात परिवर्तन घडवून आणण्याचा विचार करता तेव्हा त्यात बरेच काही बदलून टाकता. यावर्षी सुद्धा आपल्या बरोबर असेच काही होणार आहे. आपल्या मनात काही ज्वलंत विषय असतील, ज्यामुळे आपण राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवून त्यात यशस्वी सुद्धा होऊ शकता.
मकर राशीच्या व्यक्तींना या वर्षी प्रवासासंबंधी विशेष विचार करावा लागणार नाही. बहुतांश वेळी आपणास घराबाहेर राहूनच यश प्राप्ती होऊ शकते. आपण जर घरात राहत असाल तर कदाचित काम करताना सुद्धा इतर गोष्टींमुळे कुटुंबियांपासून दूर राहावे लागेल. परंतु, यातही आपणास फायदाच होईल.
मकर राशीच्या व्यक्तींना वर्षाच्या सुरुवातीस परदेश गमनाची संधी मिळेल, तेव्हा प्रयत्न करा व वेळेचा दुरुपयोग टाळा. मनात धार्मिक विचारांची वृद्धी होईल, जी आपणास योग्य मार्गावर घेऊन जाईल व आपल्या हातून कोणतेही चुकीचे कृत्य होऊ देणार नाही. त्यामुळे समाजात सुद्धा आपली पत - प्रतिष्ठा वाढेल व आपल्याकडे आदराने बघितले जाईल. भावंडांच्या बाबतीत आपण जागरूक राहाल व त्यांच्या सल्ल्यानुसार आपण एखादे मोठे पाऊल उचलाल.
मकर राशीच्या व्यक्तींना या वर्षी विविध क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात यश, प्रगती साध्य करण्यासाठी कष्ट घ्यावेच लागतील. फेब्रुवारी व मार्च दरम्यान आपण एखादी महागडी वस्तू किंवा मोबाइल खरेदी करू शकाल. अथवा ही वस्तू अशी असेल की, जी अनेक वर्षांपासून खरेदी करण्याची आपली इच्छा असेल. आई-वडिलांशी मतभेद होऊ शकतात. मात्र, वाद टाळणे उपयुक्त ठरू शकेल. आपणास परदेशातून एखादी चांगली बातमी मिळण्याची संभावना आहे. कुटुंबात एखादे शुभ कार्य होण्याची शक्यता आहे.
मकर राशीच्या व्यक्तींना विशेषतः सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान घरात एखादी चांगली बातमी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. प्रकृतीत चढ-उतार आले तरी कोणतेही मोठे दुखणे येणार नाही. आरोग्य विषयक लहान-सहान तक्रारी तर उदभवू शकतात. आपल्या मनात भौतिक सुखाची इच्छा तर होईलच, परंतु अनेकदा आपला व्यवहार संन्यासास शोभेल असा असेल. आपले मन गर्दीत रमणार नाही. तेव्हा स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून गोष्टी पुढे जाऊन आपले नुकसान होणार नाही. या वर्षी वडिलांशी असलेल्या संबंधात काही तणाव निर्माण होऊ शकतो, तेव्हा काळजी घ्यावी.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"