Chandra Grahan 2022: चंद्राला ग्रहण लागणार, पण 'या' राशीच्या लोकांचं 'ग्रहण' सुटणार; खिसा भरणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 10:43 AM2022-11-08T10:43:14+5:302022-11-08T10:43:24+5:30
Chandra Grahan 2022: सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत येणार आहेत; पण यावेळी पृथ्वी मध्ये असेल आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडणार असल्याने हे ग्रहण होईल.
मुंबई- आज २०२२ या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण (Chandra Grahan) होणार आहे. देव दिवाळीनंतर हे चंद्रग्रहण लागणार आहे. २०२२ या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण १६ मे २०२२ रोजी लागलं होतं. आज वर्षातलं हे शेवटचं अंतिम पूर्ण चंद्रग्रहण असणार आहे.
सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत येणार आहेत; पण यावेळी पृथ्वी मध्ये असेल आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडणार असल्याने हे ग्रहण होईल. २०२२ मधील हे शेवटचं चंद्रग्रहण तूळ राशी असणाऱ्या व्यक्तींना अतिशय शुभ-लाभदायक ठरू शकते. वर्षातील या शेवटच्या चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे तूळ राशीतील व्यक्तींना आर्थिक फायदा होईल.
खग्रास चंद्रग्रहणाची आज पर्वणी! सायंकाळी ५.३२ वाजता दिसणार, राज्यात कुठे किती वाजता चंद्रग्रहण?
तूळ राशीच्या लोकांचे जीवन भाग्यवान होणार आहे. तूळ राशीच्या लोकांना यावेळी आर्थिक, व्यावसायिक क्षेत्रात शुभ संकेत मिळतील. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगतीसह काही नवीन जबाबदारी मिळू शकते. यासोबतच तरुणांना नवीन कामे मिळतील. त्यामुळे बेरोजगारी दूर होईल. तसेच तूळ राशीतील व्यक्तींना तुमच्या जीवनसाथीकडून पूर्ण चांगला प्रतिसाद मिळेल.
महाराष्ट्रात गडचिरोली येथे सर्वांत आधी सायंकाळी ५.२९ वाजता ते दिसेल. नागपूरला हे ग्रहण ५.३२ वाजेपासून पाहता येईल. चंद्र हा ग्रहणातच उगवलेला असेल. तब्बल दोन तास हा सोहळा अनुभवता येणार आहे. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत येणार आहेत; पण यावेळी पृथ्वी मध्ये असेल आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडणार असल्याने हे ग्रहण होईल.
कुठे किती वाजता चंद्रग्रहण?
नागपूर सायं. ५.३२ वा.
गडचिराेली सायं. ५.२९ वा.
चंद्रपूर सायं. ५.३३ वा.
यवतमाळ सायं ५.३७ वा.
अकोला सायं ५.४१ वा.
जळगाव सायं. ५.४६ वा.
औरंगाबाद सायं. ५.५० वा.
नाशिक सायं. ५.५५ वा.
पुणे सायं. ५.५७ वा.
मुंबई सायं ६.०१ वा.