आजचे राशीभविष्य, २८ जानेवारी २०२४: कामात अपेक्षित यश मिळेल, आत्मविश्वास दुणावेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 07:30 AM2024-01-28T07:30:59+5:302024-01-28T07:32:13+5:30
जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस
मेष- आज आपल्या उग्र स्वभावावर संयम ठेवणे हितावह राहील. शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल. कष्टाच्या प्रमाणात यश मिळू शकणार नाही. संततीची काळजी सतावेल. आणखी वाचा
वृषभ - आज खंबीर मनोबल व दृढ आत्मविश्वासाने आपली कामे कराल. कामात अपेक्षित यश मिळेल. स्त्रीयांना माहेरहून लाभदायी बातमी मिळेल. आणखी वाचा
मिथुन- आजचा दिवस नव्या संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. सरकार कडून लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आणखी वाचा
कर्क- आज नकारात्मक दृष्टिकोनातून काही व्यवहार होतील. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य राहील. मनात दुःख व असंतोष राहील. डोळ्यांचा त्रास जाणवेल. आणखी वाचा
सिंह- आज आपला आत्मविश्वास दुणावेल. कोणतेही काम करण्या विषयी त्वरित निर्णय घेऊ शकाल. वडील व वडीलधार्यां कडून लाभ होईल. आणखी वाचा
कन्या - आज एखादा वाद होऊन आपला अहंकार दुखावण्याची शक्यता आहे. शारीरिक थकवा व मानसिक चिंता राहील. मित्र व स्वकीयांशी वैचारिक पातळीवर मतभेद होतील. आणखी वाचा
तूळ- आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विविध क्षेत्रांतून लाभ झाल्याने आपली प्रसन्नता वाढेल. उत्पन्न वाढेल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल व त्यांच्याकडून लाभ सुद्धा होईल. आणखी वाचा
वृश्चिक- आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण आपणास अनुकूल राहील. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. आणखी वाचा
धनु- आज प्रकृती यथा तथाच राहील. शारीरिक दृष्टया आळस व अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता व व्याकुळता राहील. व्यवसायात विघ्ने निर्माण होतील. आणखी वाचा
मकर- आज अचानकपणे खर्चाचे प्रसंग उदभवतील व त्यामुळे व्यावहारिक किंवा सामाजिक कार्यासाठी बाहेर पडावे लागेल. क्रोध नियंत्रित ठेवावा. आणखी वाचा
कुंभ- आज खंबीर मन व दृढ आत्मविश्वासाने आपण प्रत्येक काम कराल. प्रवास - सहलीची शक्यता आहे. स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद व नवी वस्त्र परिधान करण्याचे प्रसंग येतील. आणखी वाचा
मीन- आजचा दिवस शुभ फलदायी आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. शारीरिक स्वास्थ्य जाणवेल. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आणखी वाचा