राशीभविष्य, ६ एप्रिल २०२५: मित्रांसोबत फिरायला जाल, 'या' राशीच्या लोकांनी निरर्थक वाद टाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 07:34 IST2025-04-06T07:33:56+5:302025-04-06T07:34:48+5:30

Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस

Daily horoscope 6 April 2025 Astrology zodiac sign love life career predictions | राशीभविष्य, ६ एप्रिल २०२५: मित्रांसोबत फिरायला जाल, 'या' राशीच्या लोकांनी निरर्थक वाद टाळा

राशीभविष्य, ६ एप्रिल २०२५: मित्रांसोबत फिरायला जाल, 'या' राशीच्या लोकांनी निरर्थक वाद टाळा

मेष - आज आपण खूप संवेदनशील झाल्याने कोणाचे बोलणे आपल्या भावना दुखावेल. आईच्या आरोग्याची काळजी राहील. स्थावर संपत्ती संबंधी कोणताही निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. आणखी वाचा...

वृषभ -  आज शरीर व मन स्वस्थ व प्रफुल्लित राहील. कुटुंबियांशी घरातील प्रश्नांसंबंधी चर्चा कराल. मित्रांसह प्रवासाचे नियोजन कराल. आर्थिक गोष्टींकडे अधिक लक्ष दिले तर प्रत्येक कामात यश मिळेल. आणखी वाचा...

मिथुन - आज थकवा, कार्यमग्नता व प्रसन्नता ह्यांचा संमिश्र अनुभव येईल. निर्धारित कामे पूर्ण करू शकाल. धनप्राप्तीची योजना बारगळेल असे आधी वाटले तरीही नंतर त्यात यश मिळेल. आणखी वाचा...

कर्क - आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. मित्र व स्नेही यांच्यासह आजचा दिवस आपण उल्हासात घालवू शकाल. प्रवास किंवा सहलीची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. भावनाशील व्हाल. आणखी वाचा...

सिंह - आज आपणास आपल्या संवेदनशीलतेवर संयम ठेवावा लागेल. आरोग्याची काळजी राहील. त्यामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. शक्यतो निरर्थक वाद टाळा. आणखी वाचा...

कन्या - आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस आनंदात व उत्साहात जाईल. वेगवेगळ्या क्षेत्रात आज लाभ संभवतो. त्यात एखाद्या स्त्रीची भूमिका महत्वाची असेल. आणखी वाचा...

तूळ - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नोकरी - व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. वरिष्ठांसह महत्वाच्या चर्चेत सहभागी व्हाल. पदोन्नती संभवते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. माते कडून फायदा होईल. आणखी वाचा...

वृश्चिक - आज शारीरिक थकवा, आळस व मानसिक चिंता अनुभवाल. व्यवसायात अडचणी येतील. संततीशी मतभेद होतील. त्यांच्या तब्बेतीची काळजी राहील. आणखी वाचा...

धनु - आज आपण वाणी व संताप यावर आवर घालावा अन्यथा अनर्थ ओढवेल. सर्दी, खोकला यांमुळे प्रकृती खराब राहील. मानसिक तणाव जाणवेल. धन खर्च वाढेल. आणखी वाचा...

मकर - दैनंदिन काम सोडून आज आपण मनोरंजन व गाठी भेटी ह्यात आपला वेळ घालवाल. स्वादिष्ट भोजन मिळेल. मित्रांसह फिरायला जाल. भिन्नलिंगी व्यक्तीच्या सहवासात वेळ चांगला घालवाल. आणखी वाचा...

कुंभ - आजचा दिवस कार्य सिद्धीच्या दृष्टीने शुभ फलदायी आहे. कार्यातील यशाने आपली प्रसिद्धी होईल. कुटुंबीयांसह वेळ चांगला जाईल. घरातील वातावरण चांगले राहील. तन - मन उत्साही व आनंदी असेल. आणखी वाचा...

मीन - आज आपण कल्पना विश्वात विहार करणे पसंत कराल. साहित्य लेखनात आपण सृजनशीलता दाखवू शकाल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा...

Web Title: Daily horoscope 6 April 2025 Astrology zodiac sign love life career predictions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app