राशीभविष्य, ७ एप्रिल २०२५: स्फूर्ती व उत्साह अनुभवाल, मन संवेदनशील बनेल, कामे पूर्ण होतील !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 07:42 IST2025-04-07T07:41:43+5:302025-04-07T07:42:23+5:30

Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस

Daily Horoscope 7 April 2025 Astrology love life predictions career guidance future tales | राशीभविष्य, ७ एप्रिल २०२५: स्फूर्ती व उत्साह अनुभवाल, मन संवेदनशील बनेल, कामे पूर्ण होतील !

राशीभविष्य, ७ एप्रिल २०२५: स्फूर्ती व उत्साह अनुभवाल, मन संवेदनशील बनेल, कामे पूर्ण होतील !

मेष - आज आपले मन अधिक संवेदनशील बनेल. त्यामुळे कोणाचे बोलणे किंवा वागणे यामुळे मनाला दुःख होईल. मानसिक भीती बरोबर शारीरिक अस्वस्थतेमुळे आपण बेचैन व्हाल. आईचे स्वास्थ्य खराब असेल. आणखी वाचा...

वृषभ -  आज चिंतेपासून मुक्तता मिळाल्याने आपण स्फूर्ती व उत्साह अनुभवाल. हळवेपणा व काल्पनिकता यांच्या जगात वावराल. आपल्या अंतर्गत कला व साहित्य बाहेर येण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा...

मिथुन - आज काम होण्यास वेळ लागला तरी प्रयत्न चालू ठेवणे हितावह राहील. कामे नक्की पूर्ण होतील. आर्थिक योजनात सुरुवातीला काही अडचणी येतील पण नंतर मार्ग मोकळा होताना दिसेल. आणखी वाचा...

कर्क - आजचा दिवस सर्व दृष्टीने आनंददायी आहे. शारीरिक व मानसिक दृष्टया स्वस्थ व आनंदी राहाल. आप्तेष्ट व कुटुंबीयां कडून सौख्य व आनंद ह्यांची प्राप्ती होईल. तसेच त्यांच्या कडून काही भेटवस्तू मिळतील. आणखी वाचा...

सिंह - आज आपण अती भावनाशील व्हाल. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. दलाली, चर्चा व वाद ह्या पासून दूर राहणे हितावह राहील. कोर्ट - कचेरीच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा...

कन्या - आजचा दिवस लाभदायी आहे. विविध पातळ्यांवर यश, कीर्ति व लाभ होतील. धन प्राप्ती होईल. मित्र - मैत्रिणीं कडून काही लाभ संभवतात. प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे मन आनंदित होईल. आणखी वाचा...

तूळ - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात व कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. नोकरीत बढतीची संधी लाभेल. कौटुंबिक जीवनात आनंद व उत्साहाचे वातावरण असेल. आणखी वाचा...

वृश्चिक - आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी सावधपणे कामे करावी लागतील. वरिष्ठांच्या नकारात्मक धोरणाने तुम्हाला त्रास होऊ शकतो. आणखी वाचा...

धनु - आज आपणास खूप सावध राहावे लागेल. कोणतेही नवीन काम आज सुरू न करणे आपल्या हिताचे राहील. आत्यंतिक संवेदनशीलतेमुळे मनःस्थिती दुःखी होईल. पाण्या पासून सावध राहावे लागेल. आणखी वाचा...

मकर - विविध कारणांनी आपल्या व्यापाराचे विस्तृतीकरण होऊन त्यात वाढ होईल. दलाली, कमिशन, व्याज इत्यादी मार्गांनी उत्पन्नात वाढ होईल. धन लाभ संभवतो. आणखी वाचा...

कुंभ - आजचा दिवस आनंददायी आहे. कामात यश तसेच कीर्ती मिळेल. कुटुंबियांसह दिवस चांगला जाईल. नोकरी - व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आणखी वाचा...

मीन - आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपण काल्पनिक जगात रमून जाल. विद्यार्थ्यांना आपली हुशारी दाखविता येईल. आणखी वाचा...

Web Title: Daily Horoscope 7 April 2025 Astrology love life predictions career guidance future tales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app