Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, ०९ नोव्हेंबर २०२३: नवीन संबंध जुळण्याची शक्यता, मित्र व संबंधितांकडून लाभ होईल!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 07:32 AM2023-11-09T07:32:08+5:302023-11-09T07:32:36+5:30
जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष: आज सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत आपण प्रशंसेस पात्र ठराल. धनलाभाची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुख व संतोष अनुभवू शकाल. आणखी वाचा
वृषभ: आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. वाणीच्या प्रभावाने इतरांना मंत्रमुग्ध करून लाभ मिळवाल. नवीन संबंध जुळण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
मिथुन: आज आपल्या मनात विविध विचार तरंग उमटतील. त्या विचारांत आपण गढून जाल. आज बौद्धिक कार्य कराल. मात्र वाद टाळावेत. आपण आज संवेदनशील व्हाल. आणखी वाचा
कर्क: ग्लानीमुळे आज आपले मन दुःखी होईल. प्रफुल्लता, स्फूर्ती व आनंद ह्यांचा अभाव राहील. कुटुंबीयांशी मतभेद वाढतील. आणखी वाचा
सिंह: आजचा दिवस सुखा समाधानात जाईल. भावंडा बरोबरच्या संबंधात जवळीक निर्माण होईल. त्यांचे सहकार्य पण आपणास मिळेल. आणखी वाचा
कन्या: आज कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. गोड बोलण्याने आपण आपले निर्धारित काम पूर्ण करू शकाल. प्रकृती उत्तम राहील. शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळावी. आणखी वाचा
तूळ: आज आपण आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. सृजनशीलता वाढेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. दृढ विचारांमुळे हाती घेतलेले काम पूर्ण कराल. आणखी वाचा
वृश्चिक: आजचा दिवस प्रतिकूलतेचा असून एखादा अपघात किंवा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. शक्यतो वाद टाळावेत. आपल्या वक्तव्याने एखादा गैरसमज होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
धनु: आजचा दिवस लाभदायी आहे. वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकाल. मित्रांसह रम्य ठिकाणी प्रवासास जाण्याचा बेत आखाल. आणखी वाचा
मकर: आजचा दिवस व्यापार - व्यवसायासाठी लाभदायी आहे. जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी दिवस अनुकूल आहे. सरकार, मित्र व संबंधितांकडून लाभ होईल. आणखी वाचा
कुंभ: आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. मानसिक स्वास्थ्य मात्र उत्तम राहील. शरीरात स्फूर्तीचा अभाव असल्याने काम करण्यात उत्साह वाटणार नाही. आणखी वाचा
मीन: आज आपणातील लेखक किंवा कलाकारास कला व्यक्त करण्याची संधी मिळेल. व्यवसायात भागीदारी करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा