Sinha Rashi Bhavishya 2023: सिंह रास वार्षिक राशीभविष्य: इच्छित मनोकामना पूर्ण करणारे तसेच भरपूर प्रवास योगांनी युक्त आनंददायी वर्ष!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 04:07 PM2022-12-29T16:07:53+5:302022-12-29T16:09:39+5:30

Sinha Rashifal 2023: घरातील सकारात्मक बदल, प्रवासयोग आणि इच्छित मनोकामना पूर्ती यामुळे हे वर्ष आनंदात जाणार असे दिसते!

leo horoscope 2023 yearly predictions sinha rashi bhavishya 2023 in marathi | Sinha Rashi Bhavishya 2023: सिंह रास वार्षिक राशीभविष्य: इच्छित मनोकामना पूर्ण करणारे तसेच भरपूर प्रवास योगांनी युक्त आनंददायी वर्ष!

Sinha Rashi Bhavishya 2023: सिंह रास वार्षिक राशीभविष्य: इच्छित मनोकामना पूर्ण करणारे तसेच भरपूर प्रवास योगांनी युक्त आनंददायी वर्ष!

googlenewsNext

हे वर्ष आपल्यासाठी बऱ्याच नवीन गोष्टी घेऊन येणारे आहे. वर्षाच्या सुरवातीपासूनच आपल्या आत्मविश्वासाचे स्तर उंचावलेले असेल. देवावर आपली श्रद्धा वाढून आपण धार्मिक कार्यात सुद्धा सहभागी होऊ लागाल. ह्या वर्षात आपण एखाद्या धार्मिक कार्याचे आयोजन सुद्धा करू शकता. त्यामुळे समाजात आपली पत वाढून आपणास प्रतिष्ठित व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. काही मोठ्या व्यक्तींशी संपर्क होऊन येणाऱ्या काळात आपणास चांगला लाभ होईल. 

हे वर्ष गुंतवणुकीसाठी आपणास अनुकूल असल्याने गुंतवणुकीतून आपल्याला चांगला परतावा मिळेल. परंतु अल्प कालीन गुंतवणूक करण्याऐवजी दीर्घ कालीन गुंतवणूक जास्त फलदायी ठरेल. तेव्हा आपण त्यानुसार गुंतवणूक करावी. 

वर्षाच्या सुरवातीस आपण एखाद्या दूरवरच्या प्रवासास जाऊ शकाल. कदाचित आपण आपणास प्रिय असलेल्या व जवळच्या व्यक्तींसह फिरावयास जाल. त्याने आपणास नवीन ऊर्जा मिळेल व जीवनातील सर्व समस्यांवर मात करून आपल्या कामावर लक्ष केंद्रित कराल. ह्या वर्षी आपणास भरपूर प्रवास करण्याची संधी मिळेल. काही दूरवरचे विशेषतः परदेशातील प्रवास सुद्धा संभवतात. 

ह्या वर्षी आरोग्याच्या बाबतीत आपण काहीसे कमकुवत राहाल. तेव्हा आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. आरोग्य विषयक लहान - सहान तक्रारी सुद्धा मोठे स्वरूप धारण करण्याच्या शक्यतेमुळे स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. 

स्वतःसाठी खरेदी सुद्धा करावी. विशेषतः वर्षाच्या मध्यास आपणास खरेदी करण्याची संधी मिळेल, ज्यात आपणास भरपूर सवलतीत काही महागड्या वस्तू प्राप्त होऊ शकतील. ह्या वर्षी अनेक वर्षांपासून आपल्या मनात घर करून असलेली एखादी इच्छा पूर्ण झाल्याने आपणास अतिशय आनंद होईल. 

वर्षाच्या सुरवातीस आपण आपल्या भावंडांच्या एखाद्या समस्येने त्रस्त होण्याची शक्यता आहे. परंतु पहिला महिना संपल्यावर हळूहळू परिस्थितीत बदल होऊ लागेल. कदाचित आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा विवाह ठरल्याने कुटुंबात आनंद पसरेल. जमीन - जुमल्याशी संबंधित बाबींकडे आपण आकर्षित व्हाल व ती खरेदी करण्यात सुद्धा यशस्वी होऊ शकाल. त्यामुळे आपला आर्थिक स्तर सुद्धा उंचावेल.

Web Title: leo horoscope 2023 yearly predictions sinha rashi bhavishya 2023 in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app