आजचे राशीभविष्य, ०३ नोव्हेंबर २०२३: आनंदाचा दिवस, मान-सन्मान वाढेल; व्यापारात नफा होईल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 07:27 AM2023-11-03T07:27:06+5:302023-11-03T07:31:42+5:30
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
मेष: आज आपणाला नवीन कार्य करण्याची प्रेरणा झाली तरी विचारात स्थिरतेचा अभाव असल्यामुळे काही बाबींत त्रास होईल. नोकरी - व्यवसायात स्पर्धात्मक वातावरण असेल. जवळपासच्या प्रवासाची शक्यता आहे. भावंडांशी सलोखा राहील. फायदा मिळेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. आणखी वाचा
वृषभ: आज आपल्या मनाची दोलायमान अवस्था महत्वाच्या संधीपासून आपणाला दूर ठेवेल. आज नवे कार्य सुरू करणे उचित ठरणार नाही. चर्चेत आपल्या फसव्या व्यवहारामुळे संघर्ष निर्माण होईल. आर्थिक लाभ होईल. आजचा दिवस विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. आणखी वाचा
मिथुन: आजचा दिवस उत्साह व स्फूर्तीदायक आहे. स्वादिष्ट भोजन, सुंदर वस्त्रालंकार तसेच मित्र व आप्तांचा सहवास यांमुळे दिवस खूप आनंदात जाईल. दांपत्य जीवनात सुख - समाधान लाभेल. आर्थिक लाभ व नियोजनास आजचा दिवस अनुकूल आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. आणखी वाचा
कर्क: आज कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील. मानसिकदृष्टया आपण अस्वस्थ राहाल. द्विधा मनःस्थिती राहिल्याने महत्वाचे निर्णय लांबणीवर टाका. कोणाशी गैरसमज किंवा वादविवाद होण्याची शक्यता आहे. मानहानी व धनहानी होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
सिंह: आजचा दिवस आपणासाठी लाभदायक ठरेल, पण मनाची दोलायमान अवस्था हाती आलेली संधी गमावू देणार नाही याची दक्षता घ्या. वडीलधार्यांचे आशीर्वाद मिळतील. घरात मंगल कार्ये ठरतील. मित्रांची भेट होईल व त्यांच्यापासून फायदा होईल. व्यापारवृद्धी होईल. नोकरदारांचे उत्पन्न वाढेल. आणखी वाचा
कन्या: आज नवीन कार्याची सुरुवात करण्या विषयी मनात आखलेल्या योजना साकार होतील. पित्याबद्दल आत्मीयता वाढेल. लाभ होईल. व्यापारी तथा नोकरदार आपल्या क्षेत्रांत पुढे जात राहतील. धन, मान-सन्मान वाढेल. सरकारकडून लाभ होईल. कौटुंबिक जीवनात सुख शांती व सुसंवाद राहील. आणखी वाचा
तूळ: आज आपण बुद्धिवादी व साहित्य प्रेमी यांच्या सहवासात ज्ञानाच्या चर्चेत वेळ घालवाल. नवीन कामे हाती घ्याल. दूरचे प्रवास कराल. परदेशगमनाच्या संधी येतील व परदेशस्थ स्नेह्यांकडून बातम्या मिळतील. संततीच्या समस्या मनात चिंता वाढवतील. आणखी वाचा
वृश्चिक: उक्ती व कृती यांवर आज संयम ठेवावा लागेल. दैनंदिन कामे वगळता इतर कामे हाती घेऊ नका. खाणे - पिणे सांभाळा. अचानक धनलाभ होईल. अभ्यासासाठी आजचा दिवस चांगला आहे. चिंतन - मनन यात वेळ घालवाल. मानसिक शांती मिळेल. आणखी वाचा
धनु: मेजवानी, सहल, प्रवास, रुचकर भोजन, सुंदर वस्त्र धारणा ही आजच्या दिवसाची विशेषता आहे. मनोरंजन विश्वात रमून जाल. दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल. सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल. बौद्धिक, तार्किक विचार विनिमय होईल. भागीदारीत लाभ होईल. आणखी वाचा
मकर: आज व्यापार - व्यवसायात वाढ होईल. आजचा दिवस आर्थिकदृष्टया लाभदायी असल्याने आर्थिक देवाण - घेवाणीत सरळपणा राहील. कुटुंबात सुख शांती नांदेल. कार्यकर्ते तसेच आपल्यावर अवलंबीत लोकांचे सहकार्य मिळेल. चांगली बातमी समजेल. प्रतिस्पर्ध्याला पराजित कराल. फायद्याच्या गुंतागुंतीपासून सावध राहावे. आणखी वाचा
कुंभ: आज आपण संतती व स्वतःचे स्वास्थ्य ह्या संबंधी चिंतीत राहाल. अपचन, पोटाचे दुखणे ह्याचा त्रास होईल. विचारात वेगाने बदल होऊन मानसिक अस्थिरता जाणवेल. आज नव्या कामाची सुरूवात करु नका. प्रवासात अडचणी येतील, म्हणून शक्य असेल तर प्रवास स्थगित करावा. आणखी वाचा
मीन: आज शारीरिक व मानसिक भीती निर्माण होईल. कुटुंबियांशी वाद - विवाद होतील. नको त्या घटनामुळे उत्साह कमी होईल. निद्रानाशाने त्रस्त व्हाल. धन व कीर्ती ह्यांची हानी होईल. स्थावर संपत्ती, वाहन इत्यादींच्या समस्या निर्माण होऊन आपली चिंता वाढेल. आणखी वाचा