आजचे राशीभविष्य, ०५ नोव्हेंबर २०२३: ७ राशींना लाभच लाभ, उत्पन्न वाढेल; प्रफुल्लित दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 06:51 AM2023-11-05T06:51:26+5:302023-11-05T06:57:43+5:30
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
मेष: आज आपण खूप संवेदनशील झाल्याने कोणाचे बोलणे आपल्या भावना दुखावेल. स्थावर संपत्ती संबंधी कोणताही निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. मानसिक तळमळ व शारीरिक अस्वास्थ्य राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. स्वाभिमान दुखावला जाईल. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जपून राहावे. आणखी वाचा
वृषभ: आज शरीर व मन स्वस्थ व प्रफुल्लित राहील. कुटुंबियांशी घरातील प्रश्नांसंबंधी चर्चा कराल. मित्रांसह प्रवासाचे नियोजन कराल. आर्थिक गोष्टींकडे अधिक लक्ष दिले तर प्रत्येक कामात यश मिळेल. नशिबाची साथ लाभेल. भावंडांचे सहकार्य मिळेल. प्रियजनांचा सहवास व सार्वजनिक सन्मान मिळेल. व्यापारात वाढ होईल. प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल. आणखी वाचा
मिथुन: आज थोडा विलंब किंवा अडचणींनंतर निर्धाराने काम पूर्ण करू शकाल. आर्थिक नियोजन यशस्वी कराल. मिष्टान्नाची प्राप्ती होईल. विद्यार्जनाच्या दृष्टीने विद्यार्थांना आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. स्नेही व मित्र परिवाराच्या भेटीने आनंद होईल. व्यापारातील वातावरण आपणास अनुकूल राहील. उत्पन्नात वाढ होईल. आणखी वाचा
कर्क: आज भावनांच्या प्रवाहात आपण मश्गुल व्हाल ज्यात कुटुंबीय व स्नेही, नातलग सहभागी होतील. भेट वस्तू मिळतील. स्वादिष्ट भोजन व बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखाल. मंगल प्रसंगांना हजेरी लावाल. आनंददायक प्रवास होतील. धनलाभ होईल. दांपत्य जीवनात जवळीक वाढेल. आणखी वाचा
सिंह: आज जास्त चिंतातुर व भावनाशील राहिल्याने आपणास शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. चुकीच्या वाद - विवादामुळे भांडण निर्माण होईल. सावध राहावे. उक्ती व कृती यात संयम राखणे आवश्यक आहे. उत्पन्नाच्या मानाने खर्च अधिक होईल. कोणाचे गैरसमज होऊ नयेत याची काळजी घ्या. आणखी वाचा
कन्या: आज नाना प्रकारचे लाभ हेणारा दिवस आहे. व्यापार - व्यवसायाच्या विकासा बरोबरच उत्पन्न वाढेल. नोकरी करणार्यांना लाभाच्या संधी मिळतील. वैवाहिक जीवनात सुख - शांती लाभेल. पत्नी, संतती, वडीलधारी यांचेकडून लाभ होईल. मित्रांसोबत रम्य पर्यटन कराल. संततीकडून चांगल्या बातम्या मिळतील. आणखी वाचा
तूळ: आज घरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण राहील. नोकरीत पगार वाढ व पदोन्नती होण्याची शक्यता आहे. आईकडून लाभ होईल. गृहसजावटीचे काम हाती घ्याल. कार्यालयात वरिष्ठ अधिकार्यांकडून कामाची स्तुती होऊन प्रेरणा मिळेल. सहकारी सहकार्य करतील. शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील. आणखी वाचा
वृश्चिक: आज प्रत्येक गोष्टीत नकारात्मक पैलूंचा अनुभव येईल. थकवा व आळस यांमुळे स्फूर्तीची उणीव राहील. मनात गाढ चिंता सतत येत राहतील. नोकरी - व्यवसायात अडचणी येतील. वरिष्ठ अधिकार्यांशी वादविवाद टाळा. परदेश गमनाच्या संधी येतील. परदेशात वास्तव्यास असणार्या नातलगांकडून आनंददायी बातम्या मिळतील. संततीविषयक चिंता राहील. आणखी वाचा
धनु: आज आपण वाणी व संताप यावर आवर घालावा अन्यथा अनर्थ ओढवेल. सर्दी, खोकला यांमुळे प्रकृती खराब राहील. मानसिक तणाव जाणवेल. धन खर्च वाढेल. निषेधार्ह व अवैध कृत्य वाईट मार्गावर नेईल हे लक्षात ठेवा. आणखी वाचा
मकर: आज आपल्या विचारात व व्यवहारात भावूकपणा जास्त राहील. तरीही आपण आपले कुटुंबीय व मित्रांसह दिवस आनंदात घालवाल. शरीर व मन, स्फूर्ती व प्रसन्नतेने भरेल. व्यवसाय वाढ होईल. दलाली, व्याज, कमिशन इत्यादी मार्गांनी उत्पन्नात वाढ होईल. भागीदारीत लाभ होईल. सामाजिक जीवनात मान - प्रतिष्ठा वाढेल. आणखी वाचा
कुंभ: आज केलेल्या कामात आपणाला यश, कीर्ती व सफलता मिळेल. कुटुंबात एकोपा राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.आपले विचार व व्यवहार यांत हळवेपणा राहील. नोकरीत सहकारी सहकार्य करतील. लाभ होईल. कामासाठी पैसा खर्च होईल. विरोधक व प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल. आणखी वाचा
मीन: आज आपल्या अंगी असलेली सृजनात्मकता बाहेर पडून आपण साहित्य क्षेत्रात लेखन किंवा पठण कार्यात रूची घ्याल. हृदयाची कोमलता प्रियजनांस जवळ आणेल. स्वभावात हळवेपणा व रसिकता राहील. स्वास्थ्याच्या दृष्टीने दिवस मध्यम आहे. विद्यार्थी अभ्यासात कौशल्य दाखवतील. मानसिक संतुलन व बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक आहे. आणखी वाचा