आजचे राशीभविष्य: गुंतवणूक लाभदायक, विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, कौटुंबिक वातावरण आनंदाचे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 07:30 AM2024-01-10T07:30:39+5:302024-01-10T07:43:28+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

today daily horoscope 10 january 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi latest | आजचे राशीभविष्य: गुंतवणूक लाभदायक, विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, कौटुंबिक वातावरण आनंदाचे

आजचे राशीभविष्य: गुंतवणूक लाभदायक, विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, कौटुंबिक वातावरण आनंदाचे

मेष: आज आपल्यात तरतरीतपणा व उत्साह यांचा अभाव राहील. तसेच रागाचे प्रमाण वाढल्याने काम बिघडण्याची शक्यता आहे. तेव्हा रागावर नियंत्रण ठेवा. कार्यालयात अधिकारी, विरोधक व घरात कुटुंबीय यांच्याशी वादात न पडता शांत राहून दिवस घालवणे अधिक चांगले. एखाद्या मंगल कार्यास किंवा बाहेरगावी जाण्याचा प्रसंग येईल.  आणखी वाचा  

वृषभ:  आज हाती घेतलेले काम पूर्ण न झाल्याने आपण निराश व्हाल. कार्यात यश मिळण्यासाठी जरा विलंब लागेल. खाण्या - पिण्यामुळे प्रकृती बिघडेल. नवीन काम सुरू करायला आजचा दिवस अनुकूल नाही. प्रवासात विघ्ने येतील. नोकरी - व्यवसायाच्या जागी कामाचा व्याप वाढल्यामुळे थकून जाल. आपणास मानसिक शांतता लाभण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.  आणखी वाचा

मिथुन:  आजच्या दिवसाचा प्रारंभ आरामदायी व प्रसन्न वातावरणात होईल. पाहुणे व मित्रांच्या सहवासात मेजवानी, सहल, किंवा मनोरंजनाचा बेत ठरवाल. नवे कपडे, दागीने व वाहन खरेदी करू शकाल. मन आनंदाने भरून जाईल. भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण राहील. सार्वजनिक जीवनात सन्मान मिळेल व लोकप्रियता वाढेल. व्यापारात भागीदारीमध्ये फायदा होईल. दांपत्यसुखाची प्राप्ती होईल. आणखी वाचा 

कर्क:  आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा राहील. कुटुंबियांना वेळ देऊ शकाल. त्यांच्या सहवासात घरात वेळ घालवाल. कार्यात सफलता मिळेल. नोकरदारांना नोकरीत लाभ होईल. सहकारी सहकार्य करतील. प्रकृती उत्तम राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. आणखी वाचा 

सिंह:   आज आपण शारीरिक व मानसिक दृष्टया स्वस्थ राहाल. आंतरिक सृजनशीलता नवीन स्वरूपात व्यक्त होईल. साहित्य लेखनात नवीन कार्य प्रदान कराल. प्रिय व्यक्तीचा सुखद सहवास लाभेल. संततीच्या प्रगतीच्या बातम्या मिळतील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. हातून एखादे परोपकारी कृत्य घडेल. गूढ व रहस्यमय विद्येकडे कल होईल. आणखी वाचा 

कन्या:  आज प्रत्येक कार्यात प्रतिकूलतेचा अनुभव येईल. आरोग्य बिघडेल. मन चिंताग्रस्त राहील. कुटुंबियांशी पटणार नाही व त्यामुळे घरात शांतता नांदणार नाही. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे. पाण्या पासून भीती आहे. सबब जलाशयाच्या ठिकाणी दुस्साहस करू नका. स्थावर मालमत्ता, वाहन इत्यादी संबंधीच्या कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी पूर्ण विचार करा. आणखी वाचा 

तूळ:  सांप्रतकाळी धाडस करणे, एखादे काम हाती घेणे यांसाठी दिवस अनुकूल आहे. योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आपणास लाभदायक ठरेल. कुटुंबात भावंडांशी आपलेपणा व खेळीमेळीचे वातावरण असेल. लहानशा प्रवासाचा बेत आखाल. विदेशातून चांगल्या बातम्या येतील. आणखी वाचा 

वृश्चिक:  आज कौटुंबिक कलह होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांशी गैरसमज होणाची शक्यता आहे. मनात येणारे नकारात्मक विचार दूर सारावे लागतील. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी येतील. अनावश्यक खर्च उदभवू नयेत ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य आपणास बेचैन करेल. आणखी वाचा 

धनु:  आज आपल्या कामात यश व आर्थिक लाभाची शक्यता आहे. एकादया मंगल कार्यास सहकुटुंब हजर राहाल. प्रवासाची शक्यता आहे. स्वकीयांची भेट आपणाला आनंदित करील. दांपत्य जीवनात जवळीक व गोडी निर्माण होईल. समाजात यश व कीर्ती वाढेल. आणखी वाचा 

मकर:  आज आपण एखाद्या मंगल कार्यांत मग्न राहाल. परोपकारी कार्यांवर पैसा खर्च होईल. नातलग, संबंधित व कुटुंबीय यांच्याशी जपून बोला कारण आपले बोलणे कोणाचे मन दुखावण्याची शक्यता आहे. खूप कष्ट व कमी यश यामुळे निराशा निर्माण होईल. आरोग्याकडे लक्ष द्या. दांपत्य जीवनात खटका उडेल. आणखी वाचा 

कुंभ:  आज आपण एखाद्या नव्या कामाचे नियोजन किंवा सुरुवात करू शकाल. नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती होईल. स्त्री मित्र आपल्या प्रगतीत मदत करतील. आर्थिक लाभाच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस फार चांगला आहे. रमणीय स्थळी पर्यटनासाठी जाण्याचा बेत ठरवाल. समाजात प्रसिद्धी मिळेल. संततीची प्रगती होईल. पत्नी व संतती कडून आनंदाची बातमी मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. आणखी वाचा 

मीन:  आज नोकरी किंवा व्यवसायात यश मिळाल्याने तसेच वरिष्ठां कडून प्रोत्साहन मिळाल्याने आपणास अत्यंत प्रसन्नतेचा अनुभव येईल. व्यापार वृद्धी होईल. वसुलीची रक्कम प्राप्त होईल. वडील व वडीलधार्‍यां कडून लाभ होईल. उत्पन्नाचे प्रमाण वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मान - सन्मान किंवा उच्चपद मिळेल. आणखी वाचा 

Web Title: today daily horoscope 10 january 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi latest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app