आजचे राशीभविष्य: सुख-संतोषाचा दिवस, आयात-निर्यात व्यापारात यश; चांगली बातमी मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 06:56 AM2024-08-11T06:56:12+5:302024-08-11T07:13:36+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

today daily horoscope 11 august 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi | आजचे राशीभविष्य: सुख-संतोषाचा दिवस, आयात-निर्यात व्यापारात यश; चांगली बातमी मिळेल

आजचे राशीभविष्य: सुख-संतोषाचा दिवस, आयात-निर्यात व्यापारात यश; चांगली बातमी मिळेल

मेष: आज आपणाला सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत प्रसिद्धी मिळेल. कौटुंबिक व दांपत्य जीवनात सुख-समाधान मिळेल. मौज-मस्ती व मनोरंजनामुळे सहजीवनात लाभ होईल. जोडीदाराशी सुसंवाद साधू शकाल. आणखी वाचा 

वृषभ: आज उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवावा लागेल. कोणाची चेष्टा-गंमत करण्याच्या नादात भांडणाची स्थिती उद्भवेल. गैरसमज निर्माण होतील. मौज-मजा, करमणूक यावर खर्च होईल. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. मानसिक उन्मत्तपणा अधिक समस्या निर्माण करील. त्यावर ताबा ठेवावा लागेल. आणखी वाचा 

मिथुन: आजचा दिवस नवीन कामाच्या आरंभाला अनुकूल नाही. जीवनसाथी व संतती ह्यांच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. चर्चा किंवा वाद-विवाद ह्यात मानहानी होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. मित्रांसाठी पैसा खर्च होईल. शारीरिक व मानसिक अस्वस्थतेमुळे उत्साहात कमतरता जाणवेल. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी सर्वसाधारणपणे चांगला आहे. आणखी वाचा 

कर्क: आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. व्याधींचा त्रास जाणवेल. कुटुंबियांशी खडाजंगी उडेल. मानहानी संभवते. वाणी यांमुळे एखादे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. पैसा खर्च होईल. वेळेवर भोजन मिळणार नाही. निद्रानाशाचा त्रास संभवतो. आणखी वाचा 

सिंह: आज आपण शरीरात चैतन्य व मनाची प्रसन्नता अनुभवाल. मित्रांबरोबर अधिक घनिष्टता अनुभवाल. मित्र किंवा स्वजन यांच्यासह लहानशी सहल कराल. आर्थिक फायदा होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास मन आनंदीत करेल. नशिबाची साथ मिळेल. आजचा दिवस नवीन काम किंवा योजना स्वीकारण्यास अनुकूल आहे. आज संगीतात विशेष रूची राहील. आणखी वाचा 

कन्या:  कौटुंबिक सुख-शांती व आनंद ह्यामुळे आजचा दिवस आनंदात जाईल. आपल्या मधुर वाणीचा प्रभाव आज इतर लोकांना प्रभावीत करेल.  मिष्टान्नासह आज आवडीचे भोजन मिळेल. आयात-निर्यात व्यापारात चांगले यश मिळेल. परंतु वाद-विवाद, चर्चा ह्यात उग्रता दाखवू नका. आणखी वाचा 

तूळ: आज आपल्यातील रचनात्मक शक्ती प्रकट होईल. सृजनात्मकताही दिसून येईल. वैचारिक दृढता असेल व त्यामुळे कामे सफल बनतील. वस्त्रालंकार, मौज - मजेची साधने व मनोरंजन ह्यासाठी पैसे खर्च होतील. आत्मविश्वास वाढेल. जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्तीचा सहवास रोमांचक व आनंददायी असेल. आणखी वाचा 

वृश्चिक: आज आपला पैसा व वेळ हौसमौज व मनोरंजन ह्यासाठी खर्च होईल. मनाला चिंता लागून राहील. कुटुंबीय किंवा सगे-सोयरे यांच्याशी गैरसमज किंवा मतभेद होतील. प्रत्येक विषयात संयम ठेवून व्यवहार केल्यास अनर्थ होणार नाही. आणखी वाचा 

धनु: आज आर्थिक लाभ व सामाजिक प्रतिष्ठा मिळवून कौटुंबिक जीवनात सुख संतोष अनुभवाल. आज मिळकतीत वाढ व व्यापारात लाभ होईल. प्रिय व्यक्तीच्या सहवासात सुखद क्षण अनुभवू शकाल. मित्रांसह पर्यटन स्थळाला भेट द्याल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. लाभ संभवतो. आणखी वाचा 

मकर: आज व्यवसायात धन, मान व प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल. व्यापारासाठी धावपळ व वसुलीसाठी प्रवास ह्यातून फायदा संभवतो. वरिष्ठ आपल्यावर खूश असल्याने पदोन्नती संभवते. सरकार, मित्र किंवा संबंधितां कडून फायदा होईल. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. संततीची प्रगती पाहून आनंदित व्हाल. आणखी वाचा 

कुंभ: आज आपण जरी शारीरिक दृष्टया अस्वस्थ असलात तरीही मानसिक दृष्टया स्वस्थता टिकवण्याचा प्रयत्न करा. आज काम करण्याचा उत्साह कमी राहील. नोकरीत वरिष्ठांच्या नाराजीस सामोरे जावे लागेल. मौज - मजा तसेच सहलीसाठी खर्च होईल. संतती बाबतीत चिंता राहील. प्रतिस्पर्ध्यां बरोबर चर्चेत सहभागी होऊ नका. परदेशातून एखादी चांगली बातमी मिळेल. आणखी वाचा 

मीन: आज अवैध कामापासून दूर राहावे. क्रोध व वाणीवर संयम ठेवावा लागेल. सरकार विरोधी कृत्यांपासून दूर राहावे. मानसिक बेचैनी जाणवेल. कुटुंबियांशी असणार्‍या संबंधात नकारात्मकता येऊ देऊ नका. योग्य दिशा सापडण्यासाठी प्रयत्न करा. आणखी वाचा 

 

Web Title: today daily horoscope 11 august 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app