आजचे राशीभविष्य, १२ जून २०२३: ‘या’ ८ राशींना शुभ-फलदायी, अनुकूल दिवस; नशिबाची साथ अन् धनलाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 07:22 AM2023-06-12T07:22:30+5:302023-06-12T07:23:28+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

today daily horoscope 12 june 2023 know what your rashi says rashi bhavishya in marathi | आजचे राशीभविष्य, १२ जून २०२३: ‘या’ ८ राशींना शुभ-फलदायी, अनुकूल दिवस; नशिबाची साथ अन् धनलाभ

आजचे राशीभविष्य, १२ जून २०२३: ‘या’ ८ राशींना शुभ-फलदायी, अनुकूल दिवस; नशिबाची साथ अन् धनलाभ

googlenewsNext

मेष: आजचा दिवस अस्वास्थ्य व त्रासाचा आहे. इतरांचे भले करण्याच्या नादात आपणावर संकटे कोसळतील. शक्यतो आज आर्थिक व्यवहार टाळावेत. तसेच कोणाला जामीन राहू नये. निर्णयशक्तीच्या अभावामुळे मनःस्थिती द्विधा होईल व त्यामुळे चिंता वाढतील. अधिक लाभाच्या हव्यासापोटी नुकसान होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा 

वृषभ: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. धनवृद्धी व पदोन्नती संभवते. व्यापारी सौदे यशस्वी होतील. कुटुंबीय व मित्रांसह आनंदाचे सुखद क्षण अनुभवू शकाल. एखादा प्रवास होऊन त्यातून काही लाभदायी नवीन संबंध प्रस्थापित होतील. आणखी वाचा 

मिथुन:  आजचा दिवस शुभ फलदायी आहे. सहकारी व वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील. सामाजिक मान - मरातब वाढेल. बढतीची शक्यता आहे. स्नेहीजनां कडून भेटवस्तू मिळतील. आरोग्य उत्तम राहील. प्रापांचिक जीवन आनंदपूर्ण राहील. आणखी वाचा 

कर्क: आज मांगलिक कार्यात आपला सहभाग असेल. मांगलिक कार्यात सहभागी झाल्याने आनंदित व्हाल. कुटुंबीयांसह वेळ आनंदात जाईल. आरोग्य उत्तम राहील. मन पण चिंतामुक्त होईल. अचानक धनलाभ संभवतो. नशिबाची साथ लाभेल. आणखी वाचा 

सिंह: आज खूप सावध राहावे लागेल. विपरित घटनांना तोंड द्यावे लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. प्रकृती बिघडल्याने अचानक खर्च करावा लागेल. कुटुंबियांशी संयमाने वागावे लागेल. अवैध कामांपासून दूर राहावे. मानसिक शांतता लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल. आणखी वाचा 

कन्या: आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. जोडीदाराशी जवळीक साधून सुखद क्षणांचा आनंद घ्याल. दांपत्य जीवनात गोडी राहील. भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण वाटेल. सामजिक व सार्वजनिक क्षेत्रांत मान - प्रतिष्ठा वाढेल. भागीदारांशी संबंध सलोख्याचे राहतील. आणखी वाचा 

तूळ:  आज घरात आनंद व शांतीचे वातावरण राहील. सुखदायक घटना घडतील. कामात यश व सफलता मिळेल. आरोग्य उत्तम राहील. आवश्यक कामांवरच खर्च होईल. नोकरीत यश मिळेल. मातुल घराण्याकडून चांगल्या बातम्या येतील. आर्थिक लाभाची शक्यता आहे. आणखी वाचा 

वृश्चिक: आपल्या घरगुती जीवनात शांतीचे व आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील. प्रकृतीत सुधारणा होईल. कार्यालयात सहकारी लोकांचे सहकार्य पूर्णपणे मिळेल. मित्र - मैत्रिणी भेटतील. स्त्रियांना माहेरहून चांगली बातमी समजेल. धन लाभ होईल. आणखी वाचा 

धनु: आज शक्यतो प्रवास टाळावा. संततीचे आरोग्य व अभ्यास ह्या संबंधी काळजी वाटेल. कामे अयशस्वी झाल्याने नैराश्य येईल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. साहित्य व कला ह्या विषयांची गोडी निर्माण होईल. कल्पना जगात विहार कराल. प्रिय व्यक्तींच्या सहवासात वेळ चांगला जाईल. आणखी वाचा 

मकर: आज शारीरिक स्वास्थ्य व मनःस्थिती चांगली राहणार नाही. परिवारात संघर्षामुळे वातावरण खिन्न बनेल. उत्साहाचा अभाव जाणवेल. नातलगांशी मतभेद होतील. शांत झोप मिळणार नाही. सामाजिक मानहानी होण्याची शक्यता आहे. वाणी संयमित ठेवावी लागेल. आणखी वाचा 

कुंभ: मानसिकदृष्टया खूप मोकळेपणा जाणवेल. मनातील चिंतेचे ढग दूर होतील. उत्साह संचारेल. भावंडांसह नवीन कार्य कराल. त्यांच्या सहवासात दिवस आनंदात जाईल. मित्र व नातेवाईक भेटतील. छोट्या प्रावसाचे बेत आखाल. नशिबाची साथ लाभेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आणखी वाचा 

मीन: आनंद, उत्साह व प्रसन्न तन - मन ह्यामुळे आज चैतन्य व स्फूर्तीचा संचार होईल. नवीन कामे हाती घ्याल. त्यात यश मिळेल. एखाद्या मंगल कार्याला हजेरी लावाल. एखादा निर्णय घेताना मनःस्थिती द्विधा झाली तर तो निर्णय स्थगित ठेवावा. कुटुंबीयांसह मिष्ठान्नाचा आस्वाद घ्याल. प्रवास होईल. आणखी वाचा 

 

Web Title: today daily horoscope 12 june 2023 know what your rashi says rashi bhavishya in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app