Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता, मानहानी संभवते!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 07:42 AM2024-09-14T07:42:54+5:302024-09-14T07:43:15+5:30
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
मेष: आज नोकरीत वरिष्ठांबरोबर महत्वाच्या विषयावर चर्चा होऊन आपण आखलेल्या योजनेला सरकार कडून फायदा होईल. कार्यालयीन कामासाठी प्रवास घडतील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल व त्यात बदल करून वातावरण प्रसन्न बनवाल. आणखी वाचा
वृषभ: आज परदेशस्थ स्नेहीजनां कडून व मित्रवर्गाकडून आनंददायी बातम्या मिळाल्याने आपण आनंदित व्हाल. परदेशी जाण्यास इच्छुक असणाऱ्यांना चांगली संधी प्राप्त होईल. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. एखाद्या प्रवासामुळे मनास आनंद होईल. आणखी वाचा
मिथुन: आज एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. एखादी शस्त्रक्रिया करावी लागेल. रागामुळे स्वतःचीच हानी होण्याची शक्यता असल्याने डोके शांत ठेवा. मानहानी संभवते. आज आपण मनाने अस्वस्थ असाल. बोलण्यावर ताबा ठेवून वादविवाद टाळणे हेच आपल्या हिताचे आहे. आणखी वाचा
कर्क: आजचा दिवस मित्र व स्वकियांच्या सहवासात आपण आनंदात घालवाल. मनोरंजनातून आनंद मिळेल. व्यापारात फायदा होईल. भागीदारांकडूनही लाभ होईल. आणखी वाचा
सिंह: आज आपले मन चिंतेने व्यग्र असेल. एक प्रकारची उदासीनता येईल. दैनंदिन व्यवहारात विघ्न येऊ शकतात. सहकार्यांचे सहकार्य आज अजिबात मिळणार नाही. आणखी वाचा
कन्या: आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी प्रतिकूल आहे. संतती विषयी चिंता लागून राहील. सट्टा - शेअर बाजार ह्यात सावध राहून व्यवहार करावेत. मन दु:खी असेल. आज कोणत्याही बौद्धिक चर्चेत भाग घेऊ नये. आणखी वाचा
तूळ: आज शारीरिक थकवा व मानसिक दृष्टया आपण व्यस्त राहाल. माते विषयी चिंता राहील. स्थावर संपत्ती विषयीचे व्यवहार सांभाळून करावे लागतील. शक्य असेल तर प्रवास टाळा. कौटुंबिक वातावरण कलहाचे असेल. एखादी मानहानी संभवते. आणखी वाचा
वृश्चिक: आजचा दिवस लाभदायी आहे. आर्थिक लाभ होतील. नशिबाची साथ मिळेल. मित्रां बरोबरच्या संबंधात सौहार्दता असेल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी आज अनुकूलता लाभेल. एखादा प्रवास ठरवाल. मन प्रसन्न राहील. आणखी वाचा
धनु: आज आपल्या मनाची अवस्था द्विधा होईल. कौटुंबिक वातावरण क्लेशदायी राहील. ठरलेली कामे पूर्ण न झाल्याने मन हताश होईल. आज एखादा महत्वपूर्ण निर्णय न घेणे उचित ठरेल. घरी व नोकरी - व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. आणखी वाचा
मकर: आज सकाळी आपले मन प्रफुल्लित असेल. आज एखादे मंगलकार्य आपण करू शकाल. वातावरण मंगलमय बनेल. मित्र, स्नेही यांच्याकडून आपणास भेटवस्तू मिळतील. व्यापार- व्यवसायात आपले वर्चस्व राहील. आपल्या कामगिरीवर वरिष्ठ खूष होतील. आणखी वाचा
कुंभ: आज मन व शरीर अस्वस्थ राहील. कुटुंबियाशी मतभेद संभवतात. आर्थिक देवाण - घेवाण किंवा गुंतवणूक करताना सावध राहावे. कोर्टाच्या कामात सुद्धा सावध राहावे लागेल. खर्च वाढेल. स्वतः तोटा सोसूनही कोणाचे तरी भले कराल. आणखी वाचा
मीन: आज अचानक धनलाभ संभवतो. संतती कडून चांगली बातमी मिळेल. बालपणीचे किंवा जुने मित्र भेटल्याने आनंदीत व्हाल. नवीन मित्रांशी सुद्धा संपर्क होईल व त्याचा भविष्यात फायदा होईल. सामाजिक प्रसंगात भाग घेण्यासाठी बाहेर जावे लागेल. आणखी वाचा