Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यश व प्रतिस्पर्ध्यांवर मात केल्यामुळे मनात प्रसन्नता दरवळेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 07:44 AM2024-07-16T07:44:16+5:302024-07-16T07:44:33+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

today daily horoscope 16 july 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi update | Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यश व प्रतिस्पर्ध्यांवर मात केल्यामुळे मनात प्रसन्नता दरवळेल!

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यश व प्रतिस्पर्ध्यांवर मात केल्यामुळे मनात प्रसन्नता दरवळेल!

मेष: आज आपणास सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रातून प्रशंसा प्राप्त होईल. आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक व दांपत्य जीवनात सौख्य लाभेल. वाहन सुख मिळेल. प्रिय व्यक्तीचे प्रेम प्राप्त करू शकाल. विचारात उग्रता व अधिकाराची भावना वाढेल. बौद्धिक चर्चेत भाग घेण्याची संधी प्राप्त होईल. समाधानि वृत्ती बाळगणे आवश्यक राहील. आजचा दिवस व्यापार्‍यांसाठी लाभदायी आहे.  आणखी वाचा 

वृषभ: आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सांभाळून नियोजित कामे ठरल्या प्रमाणे पूर्ण करू शकाल. आजारी व्यक्तींना आज प्रकृतीत सुधारणा जाणवेल. मातुल घराण्या कडून चांगली बातमी समजेल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. अडलेली कामे आज पूर्ण होतील. आता आपल्या चतुर्थाच्या अधिपतीचे गोचरीने तृतीयेतून होणारे भ्रमण आपल्यासाठी चांगले असेल. नशिबाची साथ मिळेल. प्राप्तीत सुद्धा वाढ होईल. आणखी वाचा 

मिथुन: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. नवे काम हाती घेऊ शकाल. पत्नी व संतती विषयी चिंता वाटून मनात उद्विग्नता येईल. अजीर्ण झाल्याने प्रकृती नरम-गरम राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल दिवस आहे. शक्यतो वादविवाद टाळावेत. मतभेद संभवतात. मानहानी सुद्धा संभवते. आपल्या तृतीयेच्या अधिपतीचे गोचरीने द्वितीयेतून होणारे भ्रमण उत्साहवर्धक असेल. कारकिर्दीत प्रगतीच्या बरोबरीने नशिबाची सुद्धा साथ मिळेल. व्यापारा निमित्त प्रवास सुद्धा संभवतात.  आणखी वाचा 

कर्क:  आज आपल्यात आनंद व स्फूर्ती ह्यांचा अभाव दिसून येईल. मन खिन्न होईल. छातीत दुखणे किंवा इतर काही कारणांनी त्रास होईल. निद्रानाश होईल. सार्वजनिक ठिकाणी स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो. पैसा खर्च होईल. जलाशया पासून दूर राहावे. सूर्य आता एक महिना आपल्या राशीतच राहील. त्यामुळे आपल्या स्वभावात क्रोध व अहंकार दोन्ही ही निर्माण होऊ शकतात. आणखी वाचा 

सिंह:  कामात यश व प्रतिस्पर्ध्यांवर मात केल्यामुळे मनात प्रसन्नता दरवळेल. भावंडांशी भावदर्शी संबंध प्रस्थापित होतील. मित्र व स्नेही यांच्यासह एखाद्या रमणीय पर्यटन स्थळी हिंडण्या - फिरण्याचा आनंद घेऊ शकाल. प्रकृती सुद्धा एकदम उत्तम राहील. आर्थिक लाभ होतील. मनात उद्विग्नता येणार नाही. नशिबाची साथ मिळेल. नवे कार्य हाती घेण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. आपला राशिस्वामी सूर्य आता आपल्या व्ययस्थानातून भ्रमण करत आहे. आणखी वाचा 

कन्या:  आपल्या मधुर वाणीचा इतरांच्या मनावर सकारात्मक प्रभाव होईल. घरगुती वातावरण चांगले राहील. वाणीवर ताबा ठेवल्याने वादविवाद होणार नाहीत. आर्थिक कामे मनासारखी पार पडतील. नकारात्मक विचारांपासून दूर राहावे लागेल. मित्रांची भेट होईल. छोटासा प्रवास घडेल. आपल्या व्ययस्थानाचा अधिपती सूर्य आता आपल्या लाभस्थानातून भ्रमण करेल जे आपणास मिश्र फलदायी असल्याचे ठरेल. कारकिर्दीत थोडा दबाव असल्याचे दिसू शकते.  आणखी वाचा 

तूळ:  आज आपल्या प्रत्येक कामात आत्मविश्वास असल्याचे दिसून येईल. आर्थिक योजना व्यवस्थित करू शकाल. शारीरिक व मानसिक शांतता लाभेल. वस्त्रे, अलंकार, आनंद, उल्हास ह्यासाठी खर्च होईल. वैचारिक वाढ होईल. रचनात्मक कार्यात मन रमेल. आपल्या लाभस्थानाच्या अधिपतीचे गोचरीने होणारे दशमातील भ्रमण आपणास लाभदायी होईल. ह्या दरम्यान आपणास लाभ होतील. विविध स्रोतातून प्राप्ती सुद्धा होऊ शकते. व्यावसायिक भागीदाराचे सहकार्य लाभेल. वडिलांकडून लाभ होईल.  आणखी वाचा 

वृश्चिक: शारीरिक शैथिल्य व मानसिक चिंता ह्यामुळे मन ग्रासून जाईल. वाहन चालवताना अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी. शक्यतो आज शस्त्रक्रिया टाळावी. स्नेही व कुटुंबीयांशी वाद होण्याची शक्यता आहे. कोर्ट - कचेरीच्या कामात सावध राहा किंवा शक्य असेल तर काम लांबणीवर टाका. आनंद - उल्हास ह्यासाठी खर्च कराल. आपल्या दशमाच्या अधिपतीचे भाग्यस्थानातून होणारे भ्रमण आपल्यासाठी सामान्य फलदायी राहील. नोकरीत प्रगती होईल. व्यापारात नशिबाची साथ मिळेल. खर्च झाले तरी आर्थिक स्थिती उत्तम राहील.  आणखी वाचा 

धनु:   मित्र व परिवारासह पर्यटन स्थळी भटकण्याचा आनंद मिळेल. व्यापारात लाभदायी ठरणारा दिवस आहे. कुटुंबात सुख - शांती नांदेल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळू शकेल. आपल्या भाग्यस्थानाचा अधिपती आता आपल्या अष्टमात प्रवेश करत आहे, जे विशेष शुभ फलदायी नाही. कारकिर्दीत त्रास संभवतो. व्यापारात सुद्धा निराशेस सामोरे जावे लागेल. आर्थिक नुकसान सुद्धा संभवते. नातेसंबंधात सामंजस्य टिकवून ठेवा, अन्यथा त्रास होऊ शकतो. आणखी वाचा 

मकर:  स्नेही व मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न होईल. व्यापारात पैशाच्या वसुलीसाठी बाहेर जावे लागेल व ते फायदेशीर ठरेल. व्यवसायात धन व मान - प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठांची आपणावर मर्जी राहील. नोकरीत बढतीची शक्यता आहे. एखादा अपघात संभवतो. आपल्या अष्टमाचा अधिपती सूर्य आता आपल्या सप्तमात प्रवेश करत आहे. हा महिना आपणास नात्यातील आनंद घेण्यास प्रेरित करेल. व्यापार व नोकरीत थोडा त्रास होऊ शकतो. ह्या दरम्यान कोणालाही उसने पैसे देऊ नये. आणखी वाचा 

कुंभ: शारीरिक अस्वास्थ्य राहील. शैथिल्य व आळस राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरीत चुका होतील. आनंद - मौजमजा ह्यासाठी पैसा खर्च होईल. संतती विषयक काळजी राहील. विदेशातून सुखद बातमी ऐकिवात येईल. आपल्या सप्तमाचा अधिपती सूर्य आता आपल्या षष्ठातून भ्रमण करणार आहे, जे नातेसंबंधासाठी काहीसे तणावपूर्ण होऊ शकते. ह्या दरम्यान कामाचा दबाव असेल. व्यापारात सुद्धा लाभ कमीच होईल. कर्ज सुद्धा घ्यावे लागू शकते.  आणखी वाचा 

मीन:  आज शारीरिक व मानसिक कष्टाची तयारी ठेवा. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. खर्च वाढेल. अवैध प्रवृतींमुळे अडचणीत याल. योग्य विचार व काम आपणास वाईट मार्गावर जाण्या पासून थोपवतील. आपल्या षष्ठ स्थानाचा अधिपती आता आपल्या पंचमातून भ्रमण करत आहे. सूर्य संक्रांति पासूनचा हा एक महिना आपल्यासाठी अनुकूल आहे. कोणतीही नवीन गोष्ट शिकण्याकडे आपला कल राहील. व्यापारात लाभ होईल.  आणखी वाचा

Web Title: today daily horoscope 16 july 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app