आजचे राशीभविष्य, १६ जून २०२३: विविध मार्गांनी आर्थिक लाभ, धनप्राप्तीतून फायदा; शुभ दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 07:35 AM2023-06-16T07:35:20+5:302023-06-16T07:38:30+5:30
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
मेष: आज आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. कुटुंबियांसह स्वादिष्ट भोजन घेऊन आनंदात वेळ घालवू शकाल. आर्थिक बाबतीत भविष्यासाठी उत्तम नियोजन करू शकाल. प्राप्तीत वाढ होईल. कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. कामाची कदर केली जाईल. आणखी वाचा
वृषभ: आजचा दिवस उत्साह व प्रसन्नतेचा आहे. प्रकृती उत्तम असल्याने सुख व आनंद अनुभवाल. सगे - सोयरे किंवा मित्र यांच्याकडून उपहार मिळतील. प्रवास व स्वादिष्ट भोजन ह्यामुळे आजचा दिवस आणखीच आनंदी होईल. आर्थिक फायदा संभवतो. सौख्य प्राप्त होईल. आणखी वाचा
मिथुन: आज आपले संयमशील व विचारपूर्ण वर्तन अनेक अनिष्ट गोष्टींपासून आपला बचाव करू शकेल. आपल्या वक्तव्याने गैरसमज निर्माण होतील. शारीरिक कष्ट मनाला अस्वस्थ बनवतील. कौटुंबिक वातावरण गढूळ राहील. खर्च जास्त होईल. मानसिक शांतीसाठी प्रयत्न करावे. आणखी वाचा
कर्क: आज अचानक धनप्राप्ती तसेच वेगवेगळे फायदे झाल्याने आपण आनंदित व्हाल. प्राप्तीत वाढ होईल. व्यापार्यांशी फायद्याचे सौदे होतील. संतती व पत्नी यांच्याकडून लाभ होईल. प्रवास, पर्यटन संभवतात. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील. उत्तम भोजन मिळेल. आणखी वाचा
सिंह: आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टिने उत्तम आहे. प्रत्येक कामात यश मिळेल. वरिष्ठांची मर्जी राहील. सर्वत्र आपला चांगला प्रभाव पडेल. सरकारी कामात फायदा होईल. प्रकृती चांगली राहील. वैवाहिक जीवनात गोडी राहील. घर, जमीन व मालमत्तेचे व्यवहार यशस्वी होतील. आणखी वाचा
कन्या: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. स्त्रीवर्गाकडून लाभाची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकाल. परदेशस्थ आप्तेष्टांकडून आनंददायी बातमी मिळेल. भावंडांकडून काही लाभ संभवतो. विविध मार्गाने आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
तूळ: आजचा दिवस शुभ फलदायी असल्याने नवे कार्य हाती घेऊन त्यात यशस्वी होऊ शकाल. वक्तृत्व व कृती संयमित ठेवणे हितावह राहील. द्वेषापासून दूर राहा. हितशत्रूंचा त्रास संभवतो. आरोग्याची काळजी घ्यावी. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल. मनाला शांती मिळण्यासाठी प्रयत्नशील राहा. आणखी वाचा
वृश्चिक: आजचा दिवस काहीसा वेगळाच आहे. स्वतःसाठी वेळ काढू शकाल. मित्रांसह प्रवास, मौज - मजा, मनोरंजन व एखाद्या सहलीस जाऊन तसेच रुचकर भोजन, वस्त्रालंकार इत्यादींमुळे खूप आनंदी राहाल. मान - सन्मानात वाढ होऊन एखादा सत्कार होण्याची शक्यता आहे. वाहनसौख्य मिळेल. प्रिय व्यक्तीचा सहवास घडल्याने आपले मन प्रफुल्लित होईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. आणखी वाचा
धनु: आजचा दिवस आर्थिक लाभाचा आहे. घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील. नोकरीत लाभ व सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. कार्यात यश मिळेल. प्रकृती उत्तम राहील. एखादी चांगली बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. वाणीवर संयम ठेवावा लागेल. मित्र - मैत्रिणींचा सहवास घडेल. आणखी वाचा
मकर: आज आपण मनाने खूप अशांत राहाल. कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ शकणार नाही व त्यामुळे तणावात राहाल. नशिबाची साथ न मिळाल्याने आपणास नैराश्य येईल. संतती विषयी चिंतीत व्हाल. कुटुंबातील थोरांची प्रकृती बिघडू शकते. शारीरिक दृष्टया अस्वस्थ राहाल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद-विवाद टाळावेत. आणखी वाचा
कुंभ: आज आपण अती संवेदनशील झाल्याने आपले मन बेचैन व अस्वस्थ होईल. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे. स्थावर - संपत्ती किंवा वाहन कागदपत्र बनवताना सावध राहावे. महिलांचा सौंदर्य प्रसाधने, वस्त्र, आभूषणे यांच्या खरेदीसाठी खर्च होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. आणखी वाचा
मीन: आजचा दिवस महत्वाचा निर्णय घेण्यास अनुकूल आहे. विचारात दृढता राहील. कामे पूर्ण होतील. सृजनात्मक व कलात्मक शक्ती वाढेल. भावंडांकडून फायदा होईल. कामाचे यश आपले मन आनंदी करेल. सार्वजनिक जीवनात मान - सन्मान होतील. आपल्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत करू शकाल. आणखी वाचा