Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: शब्द जपून वापरा, नवीन कार्य सुरू करायला आजचा दिवस प्रतिकूल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 07:46 AM2024-09-16T07:46:21+5:302024-09-16T07:46:47+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

today daily horoscope 16 september 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi latest | Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: शब्द जपून वापरा, नवीन कार्य सुरू करायला आजचा दिवस प्रतिकूल!

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: शब्द जपून वापरा, नवीन कार्य सुरू करायला आजचा दिवस प्रतिकूल!

मेष: आजचा दिवस आपणास लाभदायी आहे. व्यापार - व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल. दिवसभर आनंदी व खेळीमेळीचे वातावरण राहील. गृहसजावटीत काही नावीन्य आणाल. घर सुशोभित करण्यासाठी व्यवस्था बदलाल. वाहनसौख्य मिळेल. सामाजिक कार्यासाठी प्रवास होतील. रमणीय स्थळाच्या प्रवासाचा आनंद उपभोगू शकाल.  आणखी वाचा 

वृषभ:  आज आपण व्यापार वृद्धीवर आपले लक्ष केंद्रित कराल. नवीन योजना व प्रणालीच्या वापराने व्यापार प्रगतीच्या दिशेने वाढत जाईल. मात्र कामात यश मिळण्यास विलंब होईल. दुपार नंतर व्यापारातील परिस्थिती अनुकूल होईल. कामा निमित्त प्रवास करावा लागण्याची सुद्धा शक्यता आहे. पदोन्नती होईल. आपल्या कामाच्या पद्धतीमुळे वरिष्ठ आपणावर खुश होतील.  आणखी वाचा 

मिथुन:  आज आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. मनातून नकारात्मक विचार काढून टाकल्याने नैराश्यातून बाहेर पडू शकाल. अवैध कामे करून अडचणीत सापडण्याचा शक्यतेमुळे त्यापासून दूर राहणे हितावह होईल. अचानकपणे प्रवास करावा लागेल. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. नैराश्य दूर होऊ शकेल. लेखन वा साहित्यीक प्रवृत्ती मध्ये रस घ्याल.  आणखी वाचा 

कर्क:  आनंद व मनोरंजनात्मक प्रवृत्तीमुळे मन प्रफुल्लित राहील. त्यात मित्रांचे सहकार्य मिळाल्याने मनोरंजनाचा आनंद द्विगुणित होईल. दुपार नंतर तब्बेत बिघडू शकते. वाहन जपून चालवा व रागावर नियंत्रण ठेवा. शब्द जपून वापरा. नवीन कार्य सुरू करायला आजचा दिवस प्रतिकूल आहे. सूर्याच्या कन्या राशीतील गोचराचा उत्तम प्रभाव आपल्यावर होत असल्याचे दिसून येईल. आणखी वाचा 

सिंह:  आजचा दिवस व्यापार विस्ताराच्या दृष्टीने आर्थिक नियोजन करण्यास अनुकूल आहे. व्यावसायिकांना त्यांच्या हाताखाली असणार्‍या लोकांकडून व्यावसायिक लाभ होतील. धनप्राप्ती संभवते. व्याज, दलाली इत्यादी मार्गांनी प्राप्तीत वाढ होऊन आर्थिक विवंचना दूर होईल. चांगले कपडे, स्वादिष्ट भोजन ह्यामुळे मन प्रफुल्लित होईल. एखादा प्रवास संभवतो. सूर्याचे कन्या राशीतील गोचर आपल्यासाठी शुभ फलदायी आहे. ह्या गोचर भ्रमणा दरम्यान तीन ग्रहांची युती होत आहे, ज्याचा आपणास लाभ होईल.  आणखी वाचा 

कन्या: आजचा दिवस व्यवसायासाठी अनुकूल आहे. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. सूर्याचे भ्रमण आपल्याच राशीतून होत आहे. अशा परिस्थितीत हे भ्रमण आपणास विशेष लाभदायी होईल. एखाद्या मोठ्या समस्येतून दिलासा मिळेल, ज्यामुळे आपणास मानसिक शांतता जाणवेल. ह्या दरम्यान आपणास आर्थिक प्राप्ती सुद्धा होईल. सूर्याच्या गोचर भ्रमणाच्या प्रभावामुळे आपण थोडे अहंकारी झाल्याचे दिसू शकते. आणखी वाचा 

तूळ:  स्थावर संपत्ती विषयक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आईच्या तब्बेतीची काळजी राहील. कुटुंबात वाद संभवतात. दुपार नंतर स्वास्थ्य लाभेल. सृजनशील गोष्टींकडे लक्ष द्याल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस अनुकूल आहे. सूर्याच्या कन्या राशीतील गोचर भ्रमणाचा आपल्यावर चांगला प्रभाव होत असल्याचे दिसून येईल. असे असले तरी ह्या दरम्यान आपणास थोडे सावध राहावे लागेल. ह्या दरम्यान आपल्या खर्चात सुद्धा वाढ होईल.  आणखी वाचा 

वृश्चिक: वैवाहिक जीवनात निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण होईल. स्थावर संपत्ती संबंधित कामाचे सुद्धा निराकरण होऊ शकेल. भावंडांशी जवळीक साधू शकाल. दुपार नंतर कामात प्रतिकूलता जाणवेल. शारीरिक व मानसिक व्यग्रता ह्यांचा अनुभव येईल. सामाजिक क्षेत्रात अपयश येईल. कुटुंबियांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. धनहानी संभवते.  आणखी वाचा 

धनु: विद्यार्थ्यांना लेखन- वाचनात एकाग्रता ठेवावी लागेल. दुपार नंतर काळजी दूर होण्याचे उपाय मिळतील. मानसिक शांतता अनुभवाल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. हि सूर्य संक्रांति आपल्यासाठी चांगलीच आहे. नोकरी - व्यवसायात लाभ होईल. आपणास प्राप्ती सुद्धा चांगली होईल. त्याच बरोबर पदोन्नती सुद्धा संभवते. ह्या दरम्यान आपल्या कार्याची प्रशंसा होईल. आणखी वाचा 

मकर:  कार्यालयात आपला प्रभाव पडेल. दुपार नंतर मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव राहील. मनात निराशेचे ठग दाटतील. निर्णय शक्तीचा अभाव जाणवेल. घरातील कामासाठी पैसा खर्च होण्याची शक्यता. शेअर- बाजारात यशस्वीपणे गुंतवणूक करू शकाल. सूर्याचे कन्या राशीतून भ्रमण होत असताना आपणास थोडे सावध राहावे लागेल. हा कालखंड आपल्यासाठी काहीसा चिंताजनक होऊ शकतो. त्यामुळे एखाद्या योजनेवर काम करण्यात सुद्धा त्रास होऊ शकतो.  आणखी वाचा 

कुंभ: आज एखाद्या धार्मिक कार्यासाठी खर्च कराल. कोर्ट- कचेरीच्या कामात यश मिळेल. पुण्यकार्यासाठी पैसा खर्च होईल. मनःशांतीसाठी केलेल्या प्रयत्नांत यशप्राप्ती होईल. दुपार नंतर आपले प्रत्येक काम सहजपणे पार पडेल. दांपत्य जीवनात गोडवा राहील. शरीर स्वास्थ्य सुद्धा चांगले राहील. सूर्याचे कन्या राशीतील भ्रमण आपल्यासाठी विशेष चांगले नाही. असे असले तरी काही बाबतीत ह्याच गोचराचा अनुकूल प्रभाव असल्याचे दिसू शकते. आणखी वाचा 

मीन:  विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल. व्यवसायात लाभ होईल. कुटुंबात सुख- शांती लाभेल. रमणीय ठिकाणी प्रवासाला जाल. मित्रां कडून लाभ होईल. दुपार नंतर काही कारणाने मानसिक चिंता राहील. धार्मिक कार्यावर अधिक खर्च होईल. प्राप्तीच्या प्रमाणात खर्चाचे प्रमाण जास्त राहील. घरातील वातावरण शांतिदायक राहील. सूर्याच्या कन्या राशीतील गोचर भ्रमणाचा विपरीत प्रभाव आपल्या दांपत्य जीवनावर होत असल्याचे दिसू शकते. आपल्या दांपत्य जीवनात मतभेदाची स्थिती निर्माण होऊ शकते. सासुरवाडीकडील लोकांशी असलेल्या नात्याकडे सुद्धा लक्ष द्यावे लागेल. ह्या दरम्यान व्यावसायिक भागीदाराशी सुद्धा आपले संबंध ताणले गेल्याचे दिसू शकते.  आणखी वाचा 

Web Title: today daily horoscope 16 september 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi latest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app