Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी-व्यवसायात यश मिळण्याची शक्यता अधिक!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 07:45 AM2024-09-17T07:45:27+5:302024-09-17T07:55:14+5:30
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
मेष: आजचा दिवस मित्र व सामाजिक कार्ये ह्यांच्यासाठी धावपळ करण्यात जाईल. पैसा सुद्धा खर्च होईल. नवीन मित्रांच्या ओळखी होतील. भविष्यात त्यांचा उपयोग होईल. सरकारी कामे सफल होतील. मोठयांचा सहवास लाभेल, त्यांना भेटून आनंद होईल. आणखी वाचा
वृषभ: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विशेषतः व्यापार - व्यवसाय करणार्यांना आजचा दिवस अत्यंत लाभदायक आहे. नोकरीत पदोन्नती संभवते. कार्यालयात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवनात सुख शांती मिळेल. मित्र भेटीतून आनंद मिळेल. आणखी वाचा
मिथुन: आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आज आपणास मानसिक व्यग्रता व शारीरिक शिथिलता अनुभवास येईल. काम करायला उत्साह वाटणार नाही. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांचे सहकार्य मिळणार नाही. पैसा खर्च होईल. संतती बरोबर मतभेद होतील किंवा त्यांच्या चिंतेत मन व्यग्र राहील. आणखी वाचा
कर्क: आज वैचारिक नकारात्मकता मनात असल्याने दिवसभर आपण अस्वस्थ राहाल. रागावर आज संयम ठेवावा लागेल. खर्च अधिक होईल. कुटुंबियांशी संघर्ष संभवतो. आज नवीन कामे सुरू करू नये. नवे परिचय सुद्धा लाभदायी होणार नाहीत. आणखी वाचा
सिंह: आज पती - पत्नीत मतभेद होऊन कटुता निर्माण होईल. दोघांपैकी एकाचे स्वास्थ्य बिघडणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. सांसारिक किंवा इतर प्रश्नांमुळे मन उदास राहील. सामाजिक क्षेत्रात अपयशी व्हाल. भागीदारांशी सुद्धा मतभेद होऊ शकतात. कोर्ट - कचेरीपासून शक्यतो दूरच राहा. आणखी वाचा
कन्या: आज नोकरी - व्यवसायात यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. सहकार्यांचे सहकार्य वाढेल. कुटुंबातील वातावरण सुखावह असेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभ होईल. आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल. आणखी वाचा
तूळ: आपली वैचारिक व मधुर वाणी लोकांना प्रभावित करेल व तसेच त्यामुळे इतर व्यक्तींशी संबंध दृढ होतील. चर्चा - वादविवाद ह्यात सुद्धा आपला प्रभाव राहील. कष्टाच्या मानाने यश संतोषजनक नसेल. कामात सांभाळूनच पुढे चला. आणखी वाचा
वृश्चिक: आज मित्रांशी सावधपणे वागावे लागेल. शारीरिक व मानसिक अस्वस्थता राहील. मातेचे स्वास्थ्य बिघडू शकते. धन व किर्तीची हानी होईल. कौटुंबिक वातावरण त्रासदायक राहील. मन प्रसन्न नसल्याने आज झोप सुद्धा होणार नाही. आणखी वाचा
धनु: आज आपण प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आजचा दिवस नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल आहे. मित्रांसह दिवस आनंदात घालवाल. आणखी वाचा
मकर: कुटुंबियांशी गैरसमजातून मतभेदाचे प्रसंग घडल्याने मन दुःखी होईल. विनाकारण खर्च होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आज विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. शेअर्स मध्ये गुंतवणूक करू शकाल. गृहिणी आज असंतुष्ट राहतील. आणखी वाचा
कुंभ: आजचा दिवस आपणास आर्थिक दृष्टया लाभदायी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. मित्र व कुटुंबीय ह्यांच्यासह आनंदात दिवस घालवाल. प्रवास, सहल ह्यातून सुद्धा आज आनंद मिळवू शकता. आज विचारातील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करा. आणखी वाचा
मीन: स्थावर संपत्ती व कोर्ट - कचेरी ह्यांच्या पासून आज शक्यतो दूर राहा. मनाच्या एकाग्रतेमुळे सर्व कामात फायदा होईल. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. स्वकीयांचा वियोग घडू शकतो. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. मिळणार्या फायदयात नुकसान होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. आणखी वाचा