Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 07:53 AM2024-11-18T07:53:18+5:302024-11-18T07:53:51+5:30
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
मेष: आज आपले मन चंचन झाल्याने निर्णय घेणे कठीण जाईल व त्यामुळे महत्वाची कामे आपण पूर्ण करू शकणार नाही. प्रतिस्पर्ध्यांशी सामना करावा लागेल. नवीन काम करण्याची प्रेरणा मिळेल. बौद्धिक किंवा तांत्रिक चर्चेत आपण सहभागी होऊ नये. आज छोटासा प्रवास संभवतो. आज स्त्रीयांनी आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. आणखी वाचा
वृषभ: आज मन स्थिर ठेवून काम न केल्यास चांगल्या संधी हातातून निसटून जाऊ शकतात. आज हट्ट न करता समाधानी राहिलात तर चांगले होईल. ठरविलेले प्रवास होणार नाहीत. भावंडांकडून प्रेम व सहकार्य मिळेल. आणखी वाचा
मिथुन: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी आहे. शारीरिक व मानसिक दृष्टया आपणास प्रसन्नता व उत्साह यांचा अनुभव येईल. स्वादिष्ट भोजन व चांगले कपडे घालावयास मिळतील. मित्र व कुटुंबियांसह दिवस आनंदात घालवाल. आणखी वाचा
कर्क: आजचा दिवस जास्त खर्च होण्याचा आहे. कौटुंबिक वातावरण पण फारसे समाधानकारक असणार नाही. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. मनात निर्माण होणार्या अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. मनःस्थिती द्विधा होईल. आणखी वाचा
सिंह: आज व्यापारात लाभ व मिळकतीत वाढ होईल. उत्तम भोजन प्राप्ती होईल. मित्रांसह रम्य स्थळाला भेट देऊ शकता. स्त्री मित्रांचे विशेष सहाय्य मिळेल. मुलाची भेट होईल. वाडवडील किंवा मोठया भावंडांचा सहवास मिळेल. आणखी वाचा
कन्या: आज आपण नव्या कामाची जी योजना बनवली आहे ती पूर्ण होईल. व्यापार व नोकरी असलेल्यांना आजचा दिवस फायद्याचा आहे. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश झाल्याने पदोन्नतीची संधी मिळेल. पितृघराण्याकडून फायदा होईल. स्वास्थ्य चांगले राहील. कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहील. आणखी वाचा
तूळ: आज नव्या कामाची सुरूवात करण्याचा आपण प्रयत्न कराल. बौद्धिक काम व साहित्य लेखन यात गुंतून राहाल. प्रवासाची संधी मिळेल. परदेशात राहणारे मित्र व सगे सोयरे ह्यांची खुशाली समजल्याने आपण आनंदात राहाल. आणखी वाचा
वृश्चिक: आज आपणास प्रकृतीकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. कफ, श्वास, किंवा पोट यांचा त्रास होऊ शकतो. शरीराने व मनाने आज आपण अस्वस्थ राहाल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा
धनु: आजचा दिवस सुखशांती व आनंदात व्यतित होईल. मित्रांचा सहवास, स्वादिष्ट भोजन, नवे कपडे इत्यादी प्राप्त होतील. भिन्नलिंगी व्यक्तींचे आकर्षण वाढेल. त्यांच्याशी रोमांचक भेट होईल. आणखी वाचा
मकर: आज व्यापार - व्यवसायात मोठे यश मिळाले तरी आपण कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. व्यापार - व्यवसायाच्या दृष्टीने केलेल्या भावी योजना यशस्वी होतील. आर्थिक देवाण - घेवाणीचा व्यवहार व्यवस्थित पार पडेल. देश- परदेशात व्यवसाय असणाऱ्यांना फायदा होईल. आणखी वाचा
कुंभ: आज आपण बौद्धिक क्षमता, लेखनकार्य व नवनिर्मिती व्यवस्थित पूर्ण करू शकाल. विचार एकाच गोष्टीवर स्थिर राहणार नाहीत व त्यात सातत्याने बदल होत राहील. स्त्रीयांनी आपली वाणी संयमित ठेवावी. आणखी वाचा
मीन: आज घर, वाहन इत्यादींची कागदपत्रे सांभाळून ठेवावी लागतील. घरातील वातावरण बिघडू नये ह्यासाठी संभाव्य वाद टाळावेत. आईचे आरोग्य बिघण्याची शक्यता आहे. धन व प्रतिष्ठेची हानी संभवते. स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे. उत्साह व स्फूर्तीचा अभाव जाणवेल. शक्यतो प्रवास टाळावेत. आणखी वाचा