आजचे राशीभविष्य: ५ राशींना धनलाभ, प्रमोशन, पगारवाढ योग; चैतन्य, उत्साहाचा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 06:29 AM2024-10-18T06:29:52+5:302024-10-18T06:53:25+5:30
Today Daily Horoscope 18 October 2024: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
मेष: आज आपले प्रत्येक काम उत्साह व आवेश यांनी पूर्णतः भरलेले असल्याचा अनुभव आपणास येईल. शरीर व मन स्फूर्तीटवटवीतपणाने भरेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मित्र व स्नेही यांच्यासह आनंदात वेळ घालवाल. लाभ होईल. धनलाभ, रुचकर भोजन व भेटवस्तू मिळाल्याने आनंद वाढेल. आणखी वाचा
वृषभ: आज क्रोध व निराशेची भावना मनात पसरेल. प्रकृती साथ देणार नाही. घर-परिवाराच्या चिंतेबरोबरच खर्चा बाबतीतही चिंता राहील. आपली उग्र वाणी कोणाशी मतभेद किंवा भांडणाचे कारण बनू शकेल. परिश्रम वाया जात आहेत असे वाटेल. गैरसमजापासून जपून राहावे. आणखी वाचा
मिथुन: आज कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरी-व्यवसायात लाभाच्या बातम्या मिळतील. उच्च पदाधिकारी कामाची प्रशंसा करतील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. विशेष लाभ होतील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. दांपत्य जीवनात माधुर्याचा आनंद घ्याल. संततीकडून आनंददायी बातम्या मिळतील. आणखी वाचा
कर्क: आज नोकरीत वरिष्ठांच्या प्रोत्साहनाने उत्साह द्विगुणित होईल. पगारवाढ किंवा पदोन्नती झाल्यास आश्चर्य वाटायला नको. आई तसेच इतर कुटुंबीय ह्यांच्याशी सौहार्दाचे संबंध राहतील. मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल. सरकारी कामात अनुकूलता लाभेल. आणखी वाचा
सिंह: आज आळस, थकवा व ऊबग आपल्या कामाचा वेग कमी करतील. नोकरी-व्यवसायात विघ्न संतोषी लोकांमुळे प्रगतीत अडथळा येईल. वरिष्ठांशी मतभेद होतील. रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मांगलिक कार्य किंवा प्रवास ह्यामुळे मनाची अशांती दूर होईल. आणखी वाचा
कन्या: आज मनावर संयम ठेवावा लागेल. स्वभावांतील उग्रतेमुळे मतभेद होण्याची शक्यता आहे. हितशत्रू विघ्न उपस्थित करतील. नवीन कार्यारंभ लांबणीवर टाका. खर्च खूप होईल. गूढ विद्या व रहस्य ह्यांची गोडी लागेल. आणखी वाचा
तूळ: आज दैनंदिन कामाच्या व्यापातून जरा हलके वाटावे म्हणून मेजवानी, सिनेमा किंवा पर्यटन ह्यांची योजना आखून मित्रांना आमंत्रित कराल. प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे खूप आनंद होईल. नवीन वस्त्रालंकारांची खरेदी किंवा परिधान करण्याची संधी मिळेल. सार्वजनिक मान-सन्मान प्राप्त होईल. वैवाहिक जोडीदाराच्या प्रेमाची उब व सहवास ह्यामुळे आनंदित व्हाल. आणखी वाचा
वृश्चिक: कौटुंबिक वातावरण आनंद व उत्साहाने पूर्णपणे भरलेले असेल. शरीरात चैतन्य व उत्साह संचारेल. प्रतिस्पर्धी तसेच गुप्त शत्रू ह्यांच्यावर मात करू शकाल. कामात अपेक्षित सहकार्य मिळेल. मित्र - मैत्रिणींचा सहवास आनंद व्दिगुणित करेल. आर्थिक लाभ संभवतात. अपूर्ण कामे पूर्ण होतीत. आणखी वाचा
धनु: आज शक्यतो प्रवासाचा बेत स्थगित ठेवावा. कार्यातील अपयश मनात नैराश्य निर्माण करील व त्यामुळे संताप वाढेल. पण हा राग नियंत्रणात ठेवल्यास गोष्टी जास्त चिघळणार नाहीत. वाद-विवाद किंवा चर्चा यामुळे समस्या निर्माण होईल. संततीची काळजी वाटेल. धनप्राप्ती होईल. आणखी वाचा
मकर: आज उत्साह व स्फूर्ती ह्यांचा अभाव असल्याने अस्वस्थता वाटेल. मनाला चिंता लागून राहील. कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मन खिन्न होईल. वेळेवर भोजन व शांत झोप मिळणार नाही. धन, खर्च व अपयश ह्या पासून सांभाळून राहावे लागेल. आणखी वाचा
कुंभ: आज आपणास चिंतामुक्त झाल्याने जरा हायसे वाटेल. उत्साह वाढेल. वडील व मित्र यांच्याकडून फायद्याची अपेक्षा ठेवू शकता. स्नेहसंमेलन किंवा प्रवासाच्या माध्यमातून कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. दांपत्य जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकाल. आर्थिक लाभ व सामाजिक मान-प्रतिष्ठा मिळेल. आणखी वाचा
मीन: आज आपणास बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. रागामुळे एखाद्याशी मतभेद होण्याची शक्यता आहे. शारीरिक कष्ट वाढतील. कुटुंबीय व प्रियजन ह्यांच्याशी मतभेद संभवतात. विनाकारण खर्च होतील. आपल्या मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव होईल. खाण्या-पिण्यावर संयम ठेवावा लागेल. एकंदरीत आजचा दिवस विचारपूर्वक वागण्याचा आहे. आणखी वाचा