आजचे राशीभविष्य - 19 मे 2023;'या' राशीतील लोकांना चांगल्या संधी मिळतील, तर यांना अचानक धनलाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 07:11 AM2023-05-19T07:11:13+5:302023-05-19T07:28:12+5:30
Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
मेष- आपली अनेक प्रलंबित कामे पूर्ण होतील. मनातील काळजीचे विचार दूर होण्यास सुरुवात होईल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. लोकांच्या मनात तुमच्याबद्दल आदराची भावना असेल.
वृषभ- अडचणी दूर होण्यास सुरुवात होईल. आरामात कामे करा. फार दगदग होणार नाही, याची काळजी घ्या. आर्थिक बाजू बळकट राहील. अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे. भावंडाची ख्यालीखुशाली कळेल. जीवनसाथी चांगली साथ देईल.
मिथुन- महत्त्वाची कामे दुपारच्या आत आटोपून घ्या. त्यानंतर कामात अडथळे येऊ शकतात व दगदगपण होईल. सकाळच्या सत्रात उत्साह राहील. आर्थिक आवक चांगली राहील. मात्र, अचानक काही खर्च उद्भवतील. प्रवासात सतर्क राहा.
कर्क- नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू राहील. चांगल्या संधी मिळतील. घराच्या सजावटीसाठी व देखभाल करण्यासाठी पैसे खर्च केले जातील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील.
सिंह- सार्वजनिक कार्यात आघाडीवर राहाल. फार स्पष्टपणे बोलून लोकांना नाराज करू नका. तुमच्या बोलण्याचा व कृतीचा गैरअर्थ काढला जाऊ शकतो. त्यामुळे अकारण प्रतिक्रिया देणे टाळा. नोकरीत बदलीची शक्यता आहे.
कन्या- दिवसाची सुरुवात थोड़ी चाचपड़त होईल. काही कारणाने दगदग, धावपळ होईल, महत्त्वाची कामे फार घाईने करु नका. योग्य वेळी कामे होतील, यावर विश्वास ठेवा. काहीना अचानक धनलाभ होऊ शकतो. इतरांना मदत करावी लागेल.
तूळ - महत्त्वाची कामे आटोपून घ्या. काहीना अचानक धनलाभ होऊ शकतो. प्रवासात सतर्क राहा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. फार दगदग होईल, अशी कामे करू नका. उन्हात फिरणे टाळा. घरातील सदस्यांशी वाद टाळा.
वृश्चिक- दिवसाची सुरुवात अडखळत होईल. काही अडचणी असतील. मात्र, दुपारच्या सत्रात ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. अडलेली कामे पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यास हरकत नाही. विरोधकाच्या कारवाया थंड पडतील.
धनु- महत्त्वाची कामे सकाळच्या सत्रात पूर्ण करून घ्या. दिवसाची सुरुवात सकारात्मक पद्धतीने होईल. तुमच्या कामात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे आपली कामे झटपट आणि गोपनीयता बाळगून करणे आवश्यक आहे. खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा.
मकर- घरात लगबग राहील. एखाद्या समारंभात किंवा तयारीत व्यस्त राहाल. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. जवळच्या प्रवासाच्या योग येईल. प्रवासात सतर्क राहा. चोरीपासून जपा.
कुंभ- नोकरीत कामाचा ताण वाढेल. भाऊ बहीण यांच्यासाठी वेळ द्यावा लागेल. नाही तर ते नाराज होतील. काही अडून राहिलेली कामे गती घेतील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना काम मिळेल. कलाकार मंडळीना चांगला काळ आहे.
मीन- व्यवसायात व्यस्त राहाल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. घराच्या सजावटीकडे लक्ष चाल. त्यासाठी पैसे खर्च केले जातील. भावंडांशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्या. खेळाडूंना मैदान गाजवण्याची संधी मिळेल.
विजय देशपांडे (ज्योतिषविशारद)