Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 07:43 AM2024-09-19T07:43:57+5:302024-09-19T07:44:13+5:30
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
मेष: आज आपला कल धार्मिकता व गूढ विद्या ह्याकडे होईल. द्विधा मनामुळे ठाम निर्णय आपण घेऊ शकणार नाही. शक्यतो आज आर्थिक देवाण - घेवाण करू नका. शारीरिक व मानसिक बेचैनी राहील. मंगल कार्यावर पैसा खर्च होईल. विदेशातील स्नेह्यांकडून बातम्या प्राप्त होतील. आणखी वाचा
वृषभ: आज व्यापारात वृद्धी होण्या बरोबरच व्यापार विषयक सौदे लाभदायक ठरतील. उत्पन्नाच्या साधनांत वाढ होईल. वडीलधारी व मित्र ह्यांच्याकडून लाभ व सुखद क्षण लाभतील. दांपत्य जीवनात सुख समाधान मिळेल. पर्यटनाचे बेत आखाल. महिला वर्गाकडून लाभ होतील व मान - सन्मान मिळेल. आणखी वाचा
मिथुन: नोकरी - व्यवसायात आपल्या श्रमाचे चीज होत आहे असे वाटेल. वरिष्ठ प्रोत्साहन देतील. त्यामुळे आपला उत्साह वाढेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. पित्या कडून लाभ होईल. आणखी वाचा
कर्क: आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्या बरोबरच भाग्योदयाची संधी आपली प्रसन्नता वाढवेल. परदेशातून सुखद बातम्या येतील. मंगल कार्य, प्रवास ह्यामुळे आपल्या आनंदात भर पडेल. आणखी वाचा
सिंह: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. ठरविलेल्या कामाकडे लक्ष द्यावे लागेल. धार्मिक किंवा मंगल कार्यात आपणास सहभागी व्हावे लागेल. प्रवास संभवतात. आज आपला संताप वाढल्याने आपले मन अशांत होईल. संतती विषयक काळजी निर्माण होईल. आणखी वाचा
कन्या: सामाजिक व अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल. उंची वस्त्रे व अलंकाराची खरेदी होईल. वाहनसौख्य मिळेल. भागीदारांशी चांगले संबंध राहातील. आणखी वाचा
तूळ: घरातील सुखा - समाधानाचे वातावरण आपला आनंद वाढीस लावेल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. कामात यश प्राप्ती होईल. आणखी वाचा
वृश्चिक: आज शक्यतो प्रवासाचे आयोजन करू नये. आरोग्य विषयक चिंता निर्माण होईल. संतती विषयक समस्या निर्माण होतील. मानभंग होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा
धनु: आज जास्त संवेदनशीलते मुळे कौटुंबिक गोष्टींत मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. द्विधा मनःस्थिती मुळे मनात चलबिचल वाढेल. आरोग्याच्या दृष्टीने पण दिवस चांगला नाही. आईच्या तब्बेती विषयी विशेष खबरदारी घ्यावी लागेल. आणखी वाचा
मकर: नवीन कार्यारंभासाठी तयार राहावे लागेल. सफलता मिळेल. प्रत्येक काम जीव लावून कराल. व्यापार - व्यवसायात लाभ होईल. शेअर - सट्ट्यातील गुंतवणूक लाभ देईल. मित्र, स्वकीय व भावंडे यांच्याशी चांगले मेतकूट जमेल. आणखी वाचा
कुंभ: आज आपल्या द्विधा मनःस्थितीमुळे कोणताही ठोस निर्णय आपण घेऊ शकणार नाही. महत्वाचे निर्णय आज घेऊ नका. वाणीवर ताबा न राहिल्याने कुटुंबियांशी मतभेद होतील. मंगल कार्यावर खर्च होईल. आणखी वाचा
मीन: आजचा दिवस आनंद व उत्साहाने परिपूर्ण राहील. घरात एखादे मंगल कार्य ठरेल. नवे काम आरंभ करण्यास दिवस अनुकूल आहे. नातलग, संबंधित व मित्र यांच्याशी भेट - संवाद घडतील. त्यांच्या समवेत बाहेर फिरायला वा जेवणासाठी जाण्याची संधी येईल. आणखी वाचा