Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 07:28 AM2024-10-02T07:28:10+5:302024-10-02T07:28:29+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

today daily horoscope 2 october Today is financially and professionally beneficial | Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक

मेष

02 ऑक्टोबर, 2024 बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या सहावा असेल. आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक आहे. आर्थिक लाभ होईल. दीर्घकालीन आर्थिक नियोजन कराल. आणखी वाचा...

वृषभ

02 ऑक्टोबर, 2024 बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या पाचवा असेल. आज आपल्या विचारांचा मोठेपणा व वाणीची करामत इतरांना प्रभावित व मंत्रमुग्ध करेल. इतरांशी सौहार्दाचे संबंध राहतील. आणखी वाचा...

मिथुन

02 ऑक्टोबर, 2024 बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या चवथा असेल. आज महत्त्वाचा निर्णय घेताना आपली द्विधा मनःस्थिती होईल. आई व स्त्रीयांच्या बाबतीत संवेदनशील व्हाल. विचारांची भाऊगर्दी मानसिक थकवा निर्माण करेल. आणखी वाचा...

कर्क

02 ऑक्टोबर, 2024 बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या तिसरा असेल. आजचा दिवस कामात यश व नव्या कामाचा प्रारंभ ह्यासाठी अनुकूल आहे. मित्र व स्वकीयांचा सहवास आपणाला आनंद देईल. जवळचे प्रवास होतील. आणखी वाचा...

सिंह

02 ऑक्टोबर, 2024 बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या दुसरा असेल. आज दूरस्थ स्नेही व नातलग ह्यांच्याशी झालेल्या पत्र व्यवहारामुळे लाभ होईल. कुटुंबात सुख शांती नांदेल. स्वादिष्ट भोजन मिळेल. आणखी वाचा...

कन्या

02 ऑक्टोबर, 2024 बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम असेल. आज आपल्या वैचारिक समृद्धी व मोहक वाणी ह्यामुळे लाभ होऊन सौहार्दपूर्ण संबंध वाढवून काम पूर्ण कराल. आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक आहे. आणखी वाचा...

तूळ

02 ऑक्टोबर, 2024 बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या बारावा असेल. आज आपले बोलणे व व्यवहार ह्यावर आपणास संयम ठेवावा लागेल. कुटुंबीय व इतरांशी उद्धटपणे बोलाचाली होण्याची शक्यता आहे. परोपकाराचा बदला उपकारात मिळतो. उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल. आणखी वाचा...

वृश्चिक

02 ऑक्टोबर, 2024 बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या लाभात असेल. आज आपल्या कौटुंबिक जीवनात सुख - शांती नांदेल. पत्नी व संतती कडून चांगल्या बातम्या मिळतील. मंगलकार्ये ठरतील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. आणखी वाचा...

धनु

02 ऑक्टोबर, 2024 बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या दशमात असेल. आज यश, कीर्ती व प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल. कार्यक्षेत्रातील वरिष्ठ खूश असल्यामुळे पदोन्नतीची शक्यता आहे. स्वास्थ्य ठीक राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आणखी वाचा...

मकर

02 ऑक्टोबर, 2024 बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात असेल. आज बौद्धिक कार्य व व्यवसायात आपण नवी शैली वापराल. साहित्य व लेखन कार्याला गती मिळेल. शारीरिक अस्वास्थ्य व थकवा जाणवेल. संततीची समस्या चिंता वाढवील. आणखी वाचा...

कुंभ

02 ऑक्टोबर, 2024 बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात असेल. आज अवैध काम व नकारात्मक विचारां पासून दूर राहावे. खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल. आरोग्य बिघडेल. आणखी वाचा...

मीन

02 ऑक्टोबर, 2024 बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या सातवा असेल. दैनंदिन कामातून बाहेर पडून आज आपण सहलीसाठी किंवा मनोरंजनासाठी वेळ द्याल. स्वजनांसह सहलीस जाऊ शकता. सिनेमा, नाटक किंवा बाहेर भोजन करणे असा एखादा कार्यक्रम आखाल. आणखी वाचा...

 

 

Web Title: today daily horoscope 2 october Today is financially and professionally beneficial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app