Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - 20 ऑगस्ट 2022: 'या' राशीच्या व्यक्तींना भाग्योदयाचा योग; मिळेल आनंदवार्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 07:17 AM2022-08-20T07:17:16+5:302022-08-20T07:26:40+5:30
Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
मेष
आजच्या दिवसाचा प्रारंभ स्फूर्ती व उत्साहाने होईल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. दुपार नंतर मात्र आरोग्याच्या तक्रारी उदभवू शकतात. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. मित्र व आप्तेष्टांची भेट होईल... आणखी वाचा
वृषभ
आज कुटुंबियांशी आपण विचार - विनिमय करू शकाल. घराच्या नूतनीकरणासाठी काही तरतूद कराल. घरी मातेशी व नोकरीत वरिष्ठांशी संबंधातील सौहार्दता वाढेल. दुपार नंतर आपण सामाजिक कार्यात जास्त रस घ्याल...आणखी वाचा
मिथुन
व्यावसायिक क्षेत्रात आजचा दिवस फार चांगला जाईल. दोन्ही ठिकाणी महत्त्वाच्या विषयांवर चर्चेत सहभागी होऊ शकाल. कामाचा व्याप वाढून त्याचा आपल्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा
कर्क
आज कौटुंबिक व व्यावसायिक जीवन आनंदी राहील. ह्या दोन्ही ठिकाणी महत्वाच्या चर्चेत आपण सहभागी व्हाल. कामाचा व्याप वाढल्याने प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होईल... आणखी वाचा
सिंह
दिवसाची सुरुवात शारीरिक व मानसिक अस्वस्थतेने होईल. संतापाने इतरांची मने दुखवाल. दुपारनंतर प्रकृतीत सुधारणा होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील... आणखी वाचा
कन्या
इतरांशी वाद होऊ नयेत म्हणून आपली वाणी संयमित ठेवावी. प्रकृती नरम गरमच राहील. दुपार नंतर एखाद्या प्रवासाचे नियोजन करू शकाल. एखाद्या मंगल कार्यात सहभागी होऊ शकाल... आणखी वाचा
तूळ
आज ज्या ज्या क्षेत्रात आपण वावराल त्या त्या क्षेत्रात आपली प्रशंसा केली जाईल. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल... आणखी वाचा
वृश्चिक
आजचा दिवस आनंद साजरा करण्याचा आहे. व्यापार - व्यवसायात आपण व्यस्त राहाल व त्यातून लाभ सुद्धा होतील. अनेक लोकांच्या सहवासाने विचारांची देवाणघेवाण होईल. कौटुंबिक व वैवाहिक जीवन समाधानाचे राहील... आणखी वाचा
धनु
आजच्या दिवसाची सुरुवात शारीरिक व मानसिक थकव्याने होईल. कष्टाच्या प्रमाणात अपेक्षित यश प्राप्ती होणार नाही. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल... आणखी वाचा
मकर
आज आपण अती भावनाशील व्हाल. संपत्ती संबंधी दस्तावेजात काही अडचणी निर्माण होऊ शकतात. मानसिक त्रास संभवतो. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. शासकीय विषयात यशस्वी होऊ शकाल... आणखी वाचा
कुंभ
आज आपले विचार स्थिर राहणार नसल्याने कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका. लेखन कार्य करू शकाल. इतरांच्या वागण्या बोलण्याने आपले मन दुखावले जाऊ शकते... आणखी वाचा
मीन
आज आपणास आपल्या स्वार्थाचा त्याग करावा लागेल. कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील. वाद व मनःस्ताप टाळण्यासाठी आपली वाणी संयमित ठेवावी लागेल... आणखी वाचा