आजचे राशीभविष्य: शेअर्समधून धनलाभ, नशिबाची साथ; आगळा-वेगळा अनुभव देणारा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 06:57 AM2024-05-23T06:57:13+5:302024-05-23T06:59:15+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

today daily horoscope 23 may 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi | आजचे राशीभविष्य: शेअर्समधून धनलाभ, नशिबाची साथ; आगळा-वेगळा अनुभव देणारा दिवस

आजचे राशीभविष्य: शेअर्समधून धनलाभ, नशिबाची साथ; आगळा-वेगळा अनुभव देणारा दिवस

मेष: आजचा दिवस आगळा-वेगळा अनुभव देणारा ठरेल. गूढ व रहस्यमय विद्येची गोडी वाटेल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळण्याची शक्यता आहे. आजचा दिवस नवीन कामाचा आरंभ करण्यास अनुकूल नाही. प्रवासात अचानक संकटे येतील. क्रोध व वाणी ह्यावर संयम ठेवावा लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. आणखी वाचा 

वृषभ: आज कुटुंबीयांसह सामाजिक कार्यात किंवा एखाद्या पर्यटन स्थळी प्रवासाला जाण्याचा आनंद लुटाल. व्यापार्‍यांना व्यापारात वाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात यश व कीर्ती प्राप्त होईल. अचानक धनलाभाची पण आज शक्यता आहे. आणखी वाचा 

मिथुन: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कार्यपूर्ती व यश-कीर्ती प्राप्त होईल. कुटुंबीयांसह आज आनंद, उल्हासपूर्ण वातावरणात सुखात वेळ घालवाल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. महत्वाच्या गोष्टींवर खर्च होईल. वाणी व क्रोध यावर संयम ठेवणे आवश्यक आहे. मन दुखावले जाण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकारी अपेक्षित सहकार्य करतील. त्याच बरोबर मान-सन्मान सुद्धा प्राप्त होतील. अपूर्ण कामे तडीस जातील. आणखी वाचा 

कर्क: आजचा दिवस शारीरिक ढिलेपणाचा व मानसिक तापाचा आहे. मित्र व संतती विषयक काळजी राहील. अचानक पैसा खर्च करावा लागेल. वादग्रस्त विषय आज टाळावेत. शक्य असेल तर प्रवास करू नका. आज बौद्धिक चर्चेपासून ही दोन हात दूर राहणे उचित ठरेल. आणखी वाचा 

सिंह: आज कुटुंबातील वातावरण वाद - विवादाचे राहील. कुटुंबियांशी मतभेद होतील. मनात नकारात्मक विचार येऊन उदासीनता जाणवेल. आजचा दिवस जमीन, घर, वाहन इत्यादी व्यवहार करताना हस्ताक्षर करण्यास अनुकूल नाही. नोकरदारांना पण दिवस अनुकूल नाही.  आणखी वाचा 

कन्या: आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रेमपूर्ण संबंधांमुळे अगदी भारावून जाल. भावंडांसह वेळ आनंदात जाईल. त्यांच्याकडून लाभ पण होतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. नशिबाची साथ मिळेल. आपले नुकसान टाळण्यासाठी कोणतेही काम विचार पूर्वकच करावे. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल. आणखी वाचा 

तूळ: आज आपली द्विधा मनःस्थिती राहिल्याने कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ नये. तसेच नवीन काम सुरू करू नका. वाणीवर संयम ठेवल्यास कुटुंबीयांशी वाद होणार नाहीत. जिद्द सोडून समाधानाने राहावे लागेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. आणखी वाचा 

वृश्चिक: आज कुटुंबियांसह आनंदात दिवस घालवाल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी ठरेल. एखादी चांगली बातमी मिळेल. स्नेही व मित्रवर्ग यांच्या कडून भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. आनंददायी प्रवास घडेल. दांपत्य जीवनात गोडी अनुभवाल. आणखी वाचा 

धनु: आजचा दिवस कष्टदायी आहे. कुटुंबियांशी मतभेद होतील. स्वभावात क्रोध व आवेश राहिल्याने कोणाशी तीव्र स्वरुपाचे भांडण होईल. बोलणे व वागणे यांवर संयम ठेवावा लागेल. पैसा जास्त प्रमाणात खर्च होईल. न्यायालयाशी संबंधित कामकाजात जपून पावले उचलावीत. आणखी वाचा 

मकर: आजचा दिवस लाभदायी असून आपण एखाद्या शुभ प्रसंगाचा बेत आखाल. एखाद्या वस्तूची खरेदी करण्यास दिवस अनुकूल आहे. शेअरमध्ये धनलाभ होईल. मित्र व संबंधित ह्यांच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. सामाजिक क्षेत्रात, नोकरी - व्यवसायात लाभ होईल. आणखी वाचा 

कुंभ: आज आपण वरिष्ठ अधिकारी व वयोवृद्धांची मर्जी संपादन करू शकाल. आपली सर्व कामे अगदी सहजपणे पूर्ण होत असल्याचा अनुभव येईल. नोकरी - व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. मानसिक शांतता लाभेल. मान - सन्मान होतील. कौटुंबिक जीवनात आनंदाचा अनुभव येईल. आणखी वाचा 

मीन: आज शरीर व मन बेचैन राहील. संतती विषयक समस्या काळजी निर्माण करेल. नोकरीत वरिष्ठांशी वाद होऊन त्यांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. प्रतिस्पर्धी खंबीर बनतील. नकारात्मक विचार मनाला घेरून टाकतील. सरकारकडून एखादा त्रास संभवतो. संततीशी मतभेद होतील. आणखी वाचा 

 

Web Title: today daily horoscope 23 may 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app