आजचे राशीभविष्य: कामे निर्विघ्नपणे होतील, अचानक धनलाभ योग; अलौकिक अनुभूती लाभेल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 06:54 AM2024-05-24T06:54:34+5:302024-05-24T07:04:50+5:30
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
मेष: आज आपण सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल. गूढ रहस्यमय विद्येचे आपणास आकर्षण राहील. आपणाला एखादी अलौकिक अनुभूती होईल. वाणीवर संयम ठेवून अनेक गैरसमज आपण टाळू शकाल. अचानक धनलाभ होईल. हितशत्रूपासून जपून राहा. नवीन कार्यारंभ करू नका. आणखी वाचा
वृषभ: आज दांपत्य जीवनात विशेष आनंद मिळेल. आपण सहकुटुंब एखाद्या सामाजिक ठिकाणी फिरायला किंवा छोटा प्रवास करायला जाऊन दिवस आनंदात घालवाल. स्नेह्यांसह उत्तम भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. विदेशातील मित्रांकडून आनंददायी बातम्या मिळतील. अचानक धनलाभ होईल. व्यापार्यांना व्यापारात वृद्धी होईल. सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत यश व प्रतिष्ठा मिळेल. आणखी वाचा
मिथुन: आजचा दिवस कार्यपूर्ती, यश व कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. घरात सुखाचे व शांतीचे वातावरण राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. आज खर्च होईल पण तो अनावश्यक वाटणार नाही. अडलेली कामे पूर्ण होण्याचा मार्ग सापडेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. स्वभावातील रागावर आवर घालण्याची मात्र आवश्यकता आहे. आणखी वाचा
कर्क: आजचा दिवस अगदी शांत राहून घालवावा लागेल. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैन राहाल. अचानक खर्च उद्भवतील. आज यात्रा, प्रवास किंवा नवीन कामाची सुरुवात करणे हितावह होऊ शकणार नाही. आणखी वाचा
सिंह: आज नकारात्मक विचार नैराश्य निर्माण करतील. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. घरात विसंवादाचे वातावरण राहील. आई - वडिलांशी मतभेद होतील. जमीन, घर, वाहन खरेदी विषयक कागद पत्रांसंबंधी सावध राहा. भावनेच्या भरात वाहवत जाऊ नका. आणखी वाचा
कन्या: आज अविचाराने कोणतेही काम करण्यापासून स्वतःला जपा. कामात यश तर मिळणारच आहे. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. भावंडे व शेजारी यांच्याशी चांगले संबंध राहतील. आर्थिक लाभ होतील. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. समाजात मान - सन्मान मिळेल. चित्तवृत्ती प्रफुल्लित राहील. आणखी वाचा
तूळ: आज आपला हट्टीपणा सोडून समाधानी वृत्तीने काम करावे. आपली असंयमित वाणी कोणाशी मतभेद निर्माण करेल. द्विधा स्थितीत अडकलेले मन कोणताही ठोस निर्णय घेऊ देणार नाही. आज शक्यतो महत्त्वाचा निर्णय घेऊ नये. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. आणखी वाचा
वृश्चिक: आज आपण तन-मनाने खुश व ताजेतवाने राहाल. कुटुंबीय व मित्रांसह उत्तम भोजन, प्रवास, मनोरंजन होईल. जोडीदाराशी जवळीक वाढेल. आर्थिक लाभ होईल. मंगल कार्यानिमित्त बाहेर जावे लागेल. आनंददायक बातम्या मिळतील. आणखी वाचा
धनु: आजचा दिवस कष्टदायक आहे. कुटुंबियांशी कटकट झाल्याने मन दुःखी होईल. मानसिक दृष्टया सुद्धा अस्वस्थ राहाल. रागावर जरा अंकुश ठेवा. अधिक खर्च झाल्याने पैशाची चणचण भासेल. आणखी वाचा
मकर: आजचा दिवस नोकरी - व्यवसाय तथा समाजातील अन्य क्षेत्रांत शुभ फळे देणारा आहे. मित्र व आप्तेष्टांसह फिरावयास जाल. मंगल कार्यात हजेरी लावाल. मैत्रिणी, पत्नी व संतती यांच्याकडून लाभ होईल. विवाहोत्सुक युवक - युवतींचे विवाह ठरतील. प्रवास व सहल होईल. आणखी वाचा
कुंभ: आज आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पूर्ण झाल्याने आपण खुश व्हाल. नोकरी - व्यवसायात परिस्थिती आपणास अनुकूल राहील व कार्यात यश मिळेल. वडीलधारी व वरिष्ठ अधिकारी यांची मर्जी असल्याने कोणत्याही प्रकारच्या मानसिक दडपणातून मुक्त व्हाल. संसारात आनंद वाटेल. धनप्राप्ती तसेच बढती संभवते. आणखी वाचा
मीन: आज नकारात्मक विचार वरचढ होणार नाहीत यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल. मानसिक अस्वास्थ्य सतावेल. नोकरीत वरिष्ठांशी मतभेद संभवतात. संततीच्या समस्या सतावतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकणार नाही. शक्यतो कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका. आणखी वाचा